टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा खास विक्रम कॅरेबियन फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने T20 क्रिकेटमध्ये 463 सामने खेळले असून 455 डावांमध्ये 36.22 च्या सरासरीने 14562 धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याच्या बॅटमधून 22 शतके आणि 88 अर्धशतके झळकली आहेत. (chrisgayle333/Instagram)
दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज शोएब मलिकचे नाव आहे. मलिकने T20 फॉरमॅटमध्ये 509 सामने खेळले असून 473 डावांमध्ये 36.06 च्या सरासरीने 12515 धावा केल्या आहेत. त्याने 77 अर्धशतके झळकवली आहेत. (शोएब मलिक/इन्स्टाग्राम)
तिसऱ्या क्रमांकावर आणखी एका कॅरेबियन फलंदाजाचे नाव आहे. हा दुसरा तिसरा कोणी नसून किरॉन पोलार्ड हा स्फोटक अष्टपैलू खेळाडू आहे, जो आयपीएलमध्ये एमआयसाठी अनेकदा संकटमोचक ठरला होता. पोलार्डने आतापर्यंत टी-20 फॉरमॅटमध्ये एकूण 620 सामने खेळले आहेत. त्याच्या बॅटमधून 550 डावांमध्ये 31.14 च्या सरासरीने 12023 धावा झाल्या आहेत. (किरॉन पोलार्ड/इन्स्टाग्राम)
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅरॉन फिंच चौथ्या स्थानावर आहे. फिंचने 376 डावांमध्ये 33.80 च्या सरासरीने 11392 धावा केल्या असून, त्याने टी-20 फॉरमॅटमध्ये 382 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 8 शतके आणि 77 अर्धशतके आहेत. (एपी)
भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीचे नाव पाचव्या स्थानावर आहे. कोहलीने T20 क्रिकेटमध्ये 360 सामने खेळले असून 343 डावांमध्ये 40.88 च्या सरासरीने 11326 धावा केल्या आहेत. कोहलीच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये सहा शतके आणि 85 अर्धशतके आहेत. (एपी)