भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धा खेळवली जात आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत 2 सामने झाले असून या दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. आता 1 मार्च पासून इंदोर येथे या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याला सुरुवात होणार आहे.
भारताचा अष्टपैलू क्रिकेटर अक्षर पटेल याने जानेवारी महिन्यात मेहा पटेल हिच्याशी लग्न केले. त्यानंतर आज सोमवारी हे नवविवाहित दाम्पत्य पहाटे 4 वाजता उज्जेन येथील महाकालेश्वर मंदिरात पोहोचलं.
अक्षर पटेल याने सपत्नीक मंदिरात पूजाअर्चा केली असून अभिषेक घातला घातला. तसेच दोघे इतर भक्तगणांसोबत बाबा महाकाल भस्म आरतीमध्ये देखील सामील झाले.
अक्षर पटेल यावेळी पारंपरिक वेशात दिसला तसेच त्याच्या शरीरावर भस्म लावण्यात आले होते. अक्षर आणि त्याच्या पत्नीने मंदिरात थोडा वेळ घालवला यावेळी मंदिरात भाविकांची फार गर्दी झाली होती.
काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड विरुद्ध टी 20 मालिके दरम्यान इंदोरला आलेल्या भारतीय संघाने देखील महाकालेश्वर मंदिरात येऊन पूजा केली होती. यावेळी सूर्यकुमार यादवने रिषभ पंतच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याचे म्हंटले होते.