बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. या लोकप्रिय जोडप्याच्या लग्नाच्या रोज काही ना काही अपडेट समोर येत आहेत. अशातच आणखी नवी अपडेट समोर आलीये. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, अथिया शेट्टी आणि केएल राहुल जानेवारी 2023 च्या शेवटच्या आठवड्यात लग्न करू शकतात. अथिया आणि केएलच्या खाजगी लग्नसोहळ्यात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र सहभागी होतील. अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाचे सर्व फंक्शन 21 जानेवारी ते 23 जानेवारी 2023 दरम्यान होणार आहेत. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील 'जहाँ' या घरात हे लग्न होणार असल्याचं समोर आलं आहे. लग्नाच अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे. लोकप्रिय जोप्यांपैकी अथिया आणि केएलचं नाव येतं. दोघांचेही चाहते त्यांच्या लग्नासाठी उत्सुक आहेत.