advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Wrestlers protest : पैलवानांच्या मागे मोठे क्रिकेटर, वर्ल्ड चँम्पियन ते 600 खेळाडूंचा पाठींबा; सचिन, द्रविड, गांगुलीची भूमिका काय?

Wrestlers protest : पैलवानांच्या मागे मोठे क्रिकेटर, वर्ल्ड चँम्पियन ते 600 खेळाडूंचा पाठींबा; सचिन, द्रविड, गांगुलीची भूमिका काय?

गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपावरून अटक करण्याची मागणी भारतीय कुस्तीपटू सातत्याने करत आहेत. यासंदर्भात जंतरमंतर येथे आंदोलन करण्यात आले होते, ते 29 मे रोजी पोलिसांनी जबरदस्तीने संपवले. पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये झालेल्या या घटनेबाबत अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

01
कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांना लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्याची मागणी भारतीय कुस्तीपटूंकडून सातत्याने होत आहे. ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक बड्या महिला आणि पुरुष कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर या प्रकरणी आंदोलन केलं आहे.

02
28 मे रोजी जंतरमंतरवर सुरू असलेलं आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करुन संपवलं. पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये झालेल्या या घटनेवर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारताच्या 1983 विश्वचषक विजेत्या क्रिकेट संघाच्या सदस्याने या प्रकरणावर ताजी प्रतिक्रिया दिली आहे. पीटीआय

03
1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वातील संघाचे 13 सदस्य जिवंत आहेत. सुनील गावस्कर, रवी शास्त्री, मोहिंदर अमरनाथ, कृष्णमाचारी श्रीकांत आणि रॉजर बिन्नी यांची नावे समोर येतात. कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ दिलेल्या निवेदनावर कोणत्या माजी क्रिकेटपटूंनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत, हे मात्र समजू शकलं नाही.-एपी

04
याआधी माजी फिरकीपटू अनिल कुंबळेने जंतरमंतरवर कुस्तीपटूंसोबत घडलेल्या घटनेवर आपली प्रतिक्रिया देत ट्विट केले होते. ही वेदनादायक घटना असल्याचे सांगून त्यांनी हे प्रकरण लवकरात लवकर सोडवण्याची विनंती केली होती. (PIC: अनिल कुंबळे/Instagram)

05
याआधी, रॉबिन उथप्पा, इरफान पठाण, मनोज तिवारी यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. गेल्या काही दिवसांच्या घटनाक्रमानंतर या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. महिनाभरापूर्वी, अनुभवी क्रिकेटपटू हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग आणि महिला क्रिकेटपटू शिखा पांडे यांनी आपला पाठिंबा दर्शवला. (PIC: वीरेंद्र सेहवाग/Instagram)

06
या प्रकरणी महान फलंदाज सचिन तेंडुलकरकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. काँग्रेस युवकच्या वतीने त्यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर याप्रकरणी पोस्टरही लावण्यात आले होते. सचिनचा सहकारी आणि कर्णधार सौरव गांगुली आणि भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी देखील यावर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बीसीसीआय

  • FIRST PUBLISHED :
  • कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांना लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्याची मागणी भारतीय कुस्तीपटूंकडून सातत्याने होत आहे. ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक बड्या महिला आणि पुरुष कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर या प्रकरणी आंदोलन केलं आहे.

    MORE
    GALLERIES