मेष (Aries) : कामात अनिश्चितता राहील. व्यवसायातलं सातत्य राखण्यात उद्योगांना यश मिळेल. आर्थिक बाजू समाधानकारक राहील. जबाबदार व्यक्तींबरोबर बैठक पार पडेल. नवीन व्यक्तींना भेटताना काळजी घ्या. महत्त्वाची प्रकरणं तुम्हाला अनुकूल होतील. करार तसेच पुढे चालू ठेवा. कामाचं वातावरण चांगलं राहील. उपाय : हनुमान मंदिरात नारळ अर्पण करा.
वृषभ (Taurus) : करिअर ट्रेडिंगमध्ये सातत्य वाढवा. कामामध्ये स्मार्टनेस ठेवा. व्यवसायासाठी दिवस चांगला असेल. करिअर व्यवसायात अनुकूलता राहील. कागदोपत्री सुधारणा होतील. क्षमतेपेक्षा जास्त धोका पत्कराल; पण नुकसान होण्याची शक्यता नाही. उपाय : उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या.
मिथुन (Gemini) : आर्थिक बाबींमध्ये घाई टाळा. कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय झाल्याने त्रास होईल. खर्चाला आळा घाला. महत्त्वाच्या विषयांमध्ये सातत्य ठेवा. शिस्त पाळा. सक्रियतेने काम केलं जाईल. सिस्टीमवर भर द्याल. उपाय : तेल लावलेली पोळी कुत्र्याला द्या.
कर्क (Cancer) : व्यापार-उद्योगात जलद गतीने काम कराल. क्षमतेपेक्षा मोठी कामगिरी करण्याचा प्रयत्न कराल; पण काळजी घ्या. समकक्ष व्यक्तींचं सहकार्य मिळेल. मान-सन्मान मिळेल. आर्थिक विकासाच्या संधींचा फायदा घ्याल. उपाय : गणपतीला दूर्वा वाहा.
सिंह (Leo) : आर्थिक प्रकरणात परिस्थिती चांगली राहील. व्यवसायात वाहून घेऊन काम कराल. भावनेच्या आहारी जाऊन महत्त्वाच्या गोष्टी इतरांशी शेअर करू नका. कामाची सिस्टीम बळकट होईल. पाठिंबाही द्याल. सेवा क्षेत्रातल्या कामावर अधिक भर असेल. सकारात्मक परिस्थितीचा फायदा घ्याल. उपाय : शिवचालिसा स्तोत्राचं पठण करा.
कन्या (Virgo) : ऑफिसमधल्या व्यावसायिक सहकाऱ्यांवर विश्वास बसेल. जबाबदार आणि वरिष्ठ व्यक्तींसोबत सुसंवाद राहील. मोहात पडू नका. संयमाने आणि धर्मानं पुढे जाल. पारंपरिक उद्योग-व्यवसाय उभारण्याचा विचार कराल. धैर्य आणि पराक्रमाने तुमचं स्थान टिकवाल. उपाय : सरस्वती देवीची प्रार्थना करा.
तूळ (Libra) : व्यवसायात प्रगती कराल. आर्थिक प्रगतीने आश्चर्य वाटेल. स्पर्धेचं वातावरण असेल. व्यावसायिकांना अधिक यश मिळेल. व्यवसायाला वाहून काम कराल. वडिलोपार्जित कामांमध्ये गती राहील. तुमच्यातल्या टॅलेंटला चालना मिळेल. आर्थिक बचत होईल. उपाय : पांढऱ्या वस्तू दान करा.
वृश्चिक (Scorpio) : कामाच्या ठिकाणी सुरळीपणे पुढे जाल. व्यवसाय व नोकरी चांगली होईल. व्यावसायिक प्रयत्न अनुकूल होतील. प्रवासाची दाट शक्यता आहे. सुवार्ता मिळेल. सुविधांमध्ये वाढ होईल. सर्जनशील विषयांना वेळ द्याल. व्यावसायिक प्रयत्नांमध्ये सक्रियता राखाल. उपाय : गरीब व्यक्तीला लाल फळ दान करा.
धनू (Sagittarius) : कामाच्या ठिकाणी आज तुमचा प्रभाव पडेल. नोकरी व्यवसायात संयम राखाल. नातेसंबंधांचा फायदा होईल. लाभाच्या संधी वाढतील. सकारात्मक परिस्थिती राहील. व्यावसायिक संतुलन राखाल. योजना पुढे न्याल. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्याल.
मकर (Capricorn) : व्यवसायात करिअर चांगलं राहील. प्रलंबित प्रकरणांमध्ये गती येईल. सकारात्मकतेला धार येईल. सर्वांचं सहकार्य मिळेल. स्पर्धा टाळाल. दिनचर्येची काळजी घ्या. नव्या ऑफर्स मिळतील. कर्जाचा व्यवहार टाळा. लेखनात चुका करू नका. करारात स्पष्टता ठेवा. उपाय : भगवान शंकरांवर जलाभिषेक करा.
कुंभ (Aquarius) : धोरणात्मक नियमांचं भान राखाल. व्यावसायिक हितसंबंध जोपासाल. नोकरी-व्यवसायात आत्मविश्वास राहील. यंत्रणेवर भर द्याल. व्यावसायिकांसाठी वातावरण सामान्य राहील. उद्योग आणि व्यापारात सुधारणा होईल. ध्येय गाठण्यासाठी समर्पित राहाल. निरोगी स्पर्धा राखाल. उपाय : श्रीरामांची आरती करा.
मीन (Pisces) : व्यवसायात पुढे राहाल. धोरणात्मक नियमांचं पालन कराल. प्रयत्नांना गती मिळेल. सर्वत्र लाभ होईल. आर्थिक बाबतीत संयम दाखवाल. घाईघाईने निर्णय घेऊ नका. प्रयत्नांना गती मिळेल. करिअर उत्तम राहील. उपाय : गरीब व्यक्तीला अन्नदान करा.