सर्वेश श्रीवास्तव / अयोध्या : - अयोध्येत कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न साकार होत आहे, भगवान रामाचे भव्य मंदिर आकार घेत आहे. मंदिरात 160 वा खांब बसवण्यात आला आहे. आता मंदिरात छत बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम जून 2023 मध्ये पूर्ण होईल.
राजस्थानमधील बन्सी पहाडपूर येथील दगडांचा वापर करून बांधण्यात येत असलेले राम मंदिर आकार घेत आहे. अयोध्येतील भव्य मंदिर नगारा शैलीत वेगाने बांधले जात आहे. फोटोवरून मंदिराची भव्यता सहज लक्षात येते.
मंदिरात भगवा ध्वज आकार घेताना दिसतोय, तिथेच भगवान राम विराजमान असतील. त्या गर्भगृहाच्या छताचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. राम भक्तांना येथे अवघ्या काही महिन्यांनंतर दर्शन घेता येणार आहे.
असंख्य रामभक्त मंदिर तयार होण्याची वाट पाहत होते. राम भक्तांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे. तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडूनही मंदिराचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असून वेळोवेळी रामभक्तांना मंदिर उभारणीच्या माहिती दिली जाते.
जानेवारी 2024 मध्ये प्रभू श्रीराम भव्य मंदिरात विराजमान होतील. त्यासाठी मंदिर उभारणीत गुंतलेली संस्था युद्धपातळीवर अहोरात्र काम करत आहे.