जगाचं कल्याण व्हावे. महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम आणि आरोग्यसंपन्न व्हावा यासाठी हा विधी करण्यात येतोय. वेदमूर्ती नटराजशास्त्री यांच्या 125 ब्रह्मवृंद यामध्ये सहभागी झाले आहेत.
राजू सांकला आणि रंजना सांकला यांनी सुरुवातीला य विधीचा संकल्प केला. शनिवार, 15 जुलैपर्यंत रोज दुपारी हे धार्मिक विधी मंदिरात होणार आहेत.
रुद्र होम, गणेश याग यांसह वेगवेळे अभिषेक आणि धार्मिक विधी या अंतर्गत केले जात आहेत. गणपती मंदिरात सभामंडपात भव्य होमकुंड साकारुन हे अतिरुद्र होम करण्यात येत आहेत.
अतिरुद्र होम हा या धार्मिक विधींतील सर्वोच्च बिंदू आहे. गंगा, यमुना, इंद्रायणी, पंचगंगा, मुठा, अष्टविनायक येथील नद्या, ज्योर्तिलिंग नद्या, रामेश्वरम, 21 कुंडांचे पाणी या काळात वापरले जात आहे.
21 आयुर्वेदिक औषधी वापर होम-हवनाच्या वेळी करण्यात येत आहे. सर्व नद्यांच्या एकत्रित केलेल्या मंत्रोच्चारीत पाण्याचा बाप्पाला जलाभिषेक करण्यात येत आहे.
मेधा दक्षिणा मूर्ती होम, स्वयंवर पार्वती होम, महालक्ष्मी होम श्री सुक्त, नवग्रह होम, अरुणाप्रश्न याग, महालक्ष्मी होम श्री सुक्त, 33 कोटी देवता याग या विधीच्या अंतर्गत करण्यात येणार आहे.
मंदिरात अतिरुद्र महायज्ञ आणि वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांत भाविकांनी सहभागी व्हावे, असं आवाहन ट्रस्टकडून करण्यात आलंय.