महाभारत संपल्यानंतर धृतराष्ट्राचा वंश संपला. त्याचे सर्व 100 पुत्र महाभारतात मारले गेले. युद्ध संपल्यानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्ण गांधारीला भेटायला गेले तेव्हा त्या पुत्र शोकामुळे उदास होत्या. त्यांना वाटत होते की, कृष्णाला हवे असते तर तो हे सर्व थांबवू शकला असता आणि आपली मुले जगली असती. कृष्णा समोर आल्यावर त्यांना राग अनावर झाला. त्यांनी शाप दिला की, जसा माझा मुलगा राहिला नाही, त्याचप्रमाणे तुझा वंशही नष्ट होईल.
महाभारत संपल्यानंतर गांधारीच्या शापाचा परिणाम दिसून आला. यदुवंशी आपापसात भांडू लागले. त्यांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली. भगवान श्रीकृष्णालाही या शापाचे बळी व्हावे लागले. हे त्यालाही माहीत होते. युद्धानंतर ते 36 वर्षांनी द्वारकेपासून दूर असलेल्या जंगलात गेले. तेथे ते एका झाडाखाली विसावले. तेव्हा एका शिकाऱ्याने श्रीकृष्णाला हरण समजले आणि त्यांच्यावर बाण सोडला. जो त्यांच्या डाव्या पायाला लागला. (फाइल फोटो)
तेव्हा कृष्ण एकटाच होता. जेव्हा शिकारी तिथे पोहोचला आणि कृष्णाला बाण मारलेला पाहून पश्चात्ताप करू लागला तेव्हा कृष्ण म्हणाला, यात तुझी चूक नाही. त्रेतायुगात मी राम आणि तू बाली होतास. त्यावेळी तू माझ्यामुळे मारला गेलास. म्हणूनच तू मला बाण मारलास आणि तुझ्या हातून माझा मृत्यू होईल, असे म्हणत कृष्णाने प्राण सोडले. तेव्हा ही जागा जंगल होती. पण नंतर कृष्णाने ज्या ठिकाणी प्राण सोडले ते ठिकाण म्हणून ओळखले जाऊ लागले.
या ठिकाणाचे नाव भालका तीर्थ आहे. हे ठिकाण गुजरातच्या पश्चिम किनार्यावर असलेल्या सौराष्ट्रातील वेरावळमध्ये आहे. भगवान श्रीकृष्णाने ज्या ठिकाणी प्राण सोडला त्या ठिकाणी भालका तीर्थ नावाचे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरामागे अशीही कथा आहे की झारा नावाच्या शिकारीच्या बाणाने त्याचा जीव घेतला, त्याने येथे पूजा सुरू केली. नंतर येथे मंदिर बांधण्यात आले.
भालका तीर्थ हे सोमनाथ मंदिरापासून जवळ आहे. सहसा जे लोक सोमनाथ मंदिरात येतात, ते या ठिकाणी दर्शनासाठी येतात. श्रीकृष्णाच्या येथे झालेल्या निधनानंतर युगही बदलले. द्वापरयुग संपले आणि कलियुग सुरू झाले. श्रीकृष्णाच्या मृत्यूचा दिवस 17 फेब्रुवारी 3102 इ.स.पू. मानला जातो.
सोमनाथ मंदिरापासून भालका तीर्थ फक्त 04 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचा आणखी विकास करून मोठे पर्यटन केंद्र करण्याचा सरकारचा विचार आहे. हे ठिकाण रेल्वे आणि रस्ते मार्गाने खूप चांगले जोडलेले आहे.
8 व्या मनुवैवस्वतातील मन्वंतराच्या 28 व्या द्वापरात भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या 8 व्या मुहूर्ताच्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्याच्या जन्माचे वर्ष 3112 ईसापूर्व असल्याचे सांगितले जाते. त्याच्या जन्मानुसार, महाभारताचे युद्ध इ.स.पूर्व 3000 मध्ये झाले असावे, जे पुराणांच्या हिशोबानुसार ते मोजले जाते.
असे मानले जाते की श्रीकृष्णाच्या मृत्यूच्या वेळी त्यांचे वय सुमारे 119 वर्षे होते. तथापि, याबद्दल भिन्न धारणा आहेत. विष्णु पुराणानुसार त्यांचा मृत्यू 125 व्या वर्षी झाल्याचे सांगितले जाते. महाभारत घडले तेव्हा श्रीकृष्ण 89 वर्षांचे होते. महाभारत युद्ध झाले तेव्हा अर्जुन 55, कृष्ण 83 आणि भीष्म किमान 150 वर्षांचे होते असे मानले जाते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)