advertisement
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Rashibhavishya: 16 दिवस रेड अलर्ट! शुक्राचा अस्तकाळ या राशीच्या लोकांना अडचणीत आणेल

Rashibhavishya: 16 दिवस रेड अलर्ट! शुक्राचा अस्तकाळ या राशीच्या लोकांना अडचणीत आणेल

भौतिक सुख आणि सुविधांचा कारक शुक्र ग्रह सध्या सिंह राशीत आहे. 3 ऑगस्ट गुरुवारी संध्याकाळी 07.37 वाजता शुक्र सिंह राशीत अस्ताला जात आहे. 3 ऑगस्ट ते 19 ऑगस्टपर्यंत शुक्राचा अस्तकाळ असेल. 19 ऑगस्ट रोजी शनिवारी सकाळी 05:21 वाजता, शुक्राचा कन्या राशीत उदय होईल. कारण 7 ऑगस्ट रोजी सिंह राशीतून बाहेर पडल्यानंतर शुक्र अस्त अवस्थेत कन्या राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या जवळ येतो, तेव्हा तो अस्त पावतो, म्हणजेच सूर्य हा सर्वात तेजस्वी ग्रह असल्यामुळे तो त्याची चमक गमावतो. जेव्हा एखादा ग्रह अस्त पावतो, तेव्हा त्याचा शुभ प्रभाव कमी होतो आणि त्याचा अशुभ प्रभाव वाढू शकतो. जेव्हा एखादा ग्रह सूर्यापासून दूर जातो तेव्हा त्याचा उदय होतो आणि त्याचे तेज परत मिळवतो.

01
3 ऑगस्ट रोजी शुक्र अस्तामुळे 3 राशीच्या लोकांवर 16 दिवस अशुभ प्रभाव राहू शकतो. त्यांच्या आर्थिक बाजू, पैसा आणि करिअरवर दुष्परिणाम होऊ शकतात. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांनी शुक्र ग्रहाचे राशींवर होणारे अशुभ परिणाम सांगितले आहेत.

02
मिथुन: तुमच्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचा अस्त काळ हानिकारक ठरू शकतो. उधळपट्टीमुळे आर्थिक परिस्थिती डळमळीत होऊ शकते. बेहिशेबी खर्च वाढल्याने पैशाचे संकट उद्भवू शकते. या 16 दिवसात कोणालाही पैसे उधार देऊ नका, अन्यथा धनहानी होऊ शकते. ते पैसे परत मिळण्यात अडचण येऊ शकते.

03
याकाळात बोलण्यावर संयम ठेवा. वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. नोकरदार लोकांना कठीण काळ जाईल. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे सहकार्य न मिळाल्याने तुम्ही नाराज होऊ शकता. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वादविवाद टाळा, अन्यथा नोकरीत संकट येऊ शकते. कुटुंबात तणावपूर्ण परिस्थिती देखील असू शकते.

04
धनु: शुक्र अस्ताचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. खाण्या-पिण्याची काळजी घ्या आणि कोणतीही समस्या उद्भवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा, कारण तुम्ही आजारी पडू शकता. व्यवसाय करणाऱ्यांना सावध राहून काम करावे लागेल. हुशारीने गुंतवणूक करा किंवा एखाद्याला पैसे देताना विचारपूर्वक निर्णय घ्या, फायद्याऐवजी तोटा होऊ शकतो.

05
धनु - नोकरदार लोकांनी या 16 दिवसात आपल्या कामाशी निगडीत राहावं. कामावर जा आणि थेट घरी या. कामाचा ताण वाढेल, अशा परिस्थितीत संयमाने काम करा. शुक्राची स्थिती तुमच्या नोकरीसाठी शुभ म्हणता येणार नाही. तुम्ही प्रामाणिकपणे काम करा आणि कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा.

06
तूळ : शुक्राच्या अस्तामुळे तुमच्या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी बोलणे आणि वागणे या दोन्हींवर नियंत्रण ठेवून काम करा. नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय न घेतल्यास चांगले होईल. महत्त्वाचे निर्णय काही काळासाठी पुढे ढकला. आरोग्याची काळजी घ्या, योगा करा.

07
गुंतवणुकीची कोणतीही माहिती किंवा प्रस्ताव मिळू शकेल. पण तो तुमच्यासाठी तोट्याचा सौदा ठरू शकतो. विचार न करता किंवा इतरांच्या म्हणण्यानुसार पैसे गुंतवू नका, अन्यथा आर्थिक संकट उद्भवू शकते.

  • FIRST PUBLISHED :
  • 3 ऑगस्ट रोजी शुक्र अस्तामुळे 3 राशीच्या लोकांवर 16 दिवस अशुभ प्रभाव राहू शकतो. त्यांच्या आर्थिक बाजू, पैसा आणि करिअरवर दुष्परिणाम होऊ शकतात. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांनी शुक्र ग्रहाचे राशींवर होणारे अशुभ परिणाम सांगितले आहेत.

    MORE
    GALLERIES