राहूच्या नक्षत्रात शनीच्या संक्रमणामुळे अनेक बदल आणि परिणाम दिसून येतील. शतभिषा नक्षत्रात शनीच्या प्रवेशामुळे राष्ट्रीय स्तरावर राजकीय संघर्ष, वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप वाढू शकतात.
निवडणुकीत प्रतिकूलता -शताभिषा नक्षत्रात शनीच्या प्रवेशामुळे सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत प्रतिकूलतेला सामोरे जावे लागू शकते.
भारताची प्रतिमा आणि महत्त्व वाढेल - - शनिचा शतभिषा नक्षत्रात प्रवेश झाल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा आणि महत्त्व वाढेल. भारत राजनैतिकदृष्ट्याही यशस्वी होईल.
- ज्योतिष शास्त्रानुसार शनि जेव्हा शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल तेव्हा वैद्यक क्षेत्रातील एखादं नवीन संशोधन समोर येईल.
- याशिवाय नैसर्गिक आपत्ती आणि अपघातांना लोक बळी पडतील. -ज्योतिषशास्त्रानुसार धार्मिक स्थळावरही कोणतीही घटना घडू शकते.
सध्या शनिदेव कुंभ राशीत म्हणजेच स्वराशीत आहेत. 15 मार्च ते 17 ऑक्टोबरपर्यंत शनी शतभिषा नक्षत्रात राहील. शतभिषा नक्षत्र हे राहूचे नक्षत्र मानले जाते. यामध्ये भारताची सामरिक ताकद वाढण्याचीही शक्यता आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक संदर्भातील आणि संबंधित ज्योतिषी यांनी दिलेली आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)