राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन राम मंदिराच्या निर्माणकार्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहेत.
रामलला जिथे 5 वर्षाच्या मुलाच्या रुपात विराजमान होतील त्या गर्भगृहाचे निर्माणकार्य जवळपास 90 टक्के पूर्ण झाले आहे.
गर्भगृहाच्या वर आता स्लॅब टाकण्याचे काम केले जात आहे आणि मंदिराच्या खंब्यावर अद्भत असे नक्षीकाम केले जात आहे.
अशीच नक्षी तुम्हाला राम मंदिराच्या त्या प्रत्येक दगडावर दिसेल, ज्याचा उपयोग भव्य राम मंदिराच्या निर्माणकार्यात केला जात आहे.
काही महिन्यांनंतर मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन जाईल. यानंतर भगवान राम आपल्या गर्भगृहात विराजमान होऊन जातील.