'रामायण' इतका लोकप्रिय भारतीय टीव्ही शो क्वचितच दुसरा कोणता आहे, जो पहिल्या प्रसारणाच्या 35 वर्षांनंतरही प्रेक्षकांना मोहीत करत आहे. देवता आणि असूर मानवी रूपात कसे अस्तित्वात असू शकतात हे या मालिकेने प्रेक्षकांना सांगितले. प्रेक्षक 'रामायण' मालिकेने इतके भारावून गेले होते की ते त्यातील पात्रांची देवासारखी पूजा करायचे. आजही काही लोक 'रामायण'मध्ये रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविळ यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतात. या मालिकेत हनुमानासह इतर पात्रे साकारणाऱ्या कलाकारांना सर्वसामान्य प्रेक्षक देव मानत होते, यातील 6 कलाकार आता आपल्यात नाहीत. (फोटो क्रेडिट्स: Instagram@tekrisarkar2022@ramayan_world@sagar.world)
दारा सिंह यांनी 'रामायण'मध्ये हनुमानाची भूमिका साकारली होती. ते आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. 12 जुलै 2012 रोजी वयाच्या 83 व्या वर्षी या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. (फोटो क्रेडिट्स: Instagram @tekrisarkar2022)
'रामायण'मध्ये मेघनाथची भूमिका साकारणाऱ्या विजय अरोरा यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. 2007 मध्ये कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले. (फोटो क्रेडिट्स: Instagram @_ramayan_fan_page)
चंद्रशेखर वैद्य यांनी 'रामायण'मध्ये राजा दशरथाचा महामंत्री सुमंत ही भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली. 2021 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्युनियर आर्टिस्ट म्हणून त्यांनी अभिनय विश्वात प्रवेश केला होता. (फोटो क्रेडिट्स: Instagram @ramesh8776)
अरविंद त्रिवेदी यांनी 'रामायण'मधील महत्त्वाचे रावणाचे पात्र साकारून ते जिवंत केले. 6 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वास्तविक जीवनात ते रामाचे परम भक्त होते. (फोटो क्रेडिट्स: Instagram @satya_kadva)
'रामायण'मध्ये रावणाचा भाऊ विभीषणाची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश रावल आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे फार नाराज होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2016 मध्ये ट्रेनच्या धडकेने त्यांचा मृत्यू झाला होता. (फोटो क्रेडिट्स: Instagram@sagar.world)
'रामायण'मध्ये राणी कैकेयीची दासी मंथरा ही भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री ललिता पवार यांनी साकारली होती. त्यांचा अभिनय इतका दमदार होता की, लोक त्यांना खरीखुरी मंथरा मानू लागले. 1998 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या कर्करोगाने त्रस्त होत्या. (फोटो क्रेडिट्स: Instagram @tarangan_mandar_joshi)