शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. हा पाठ तुमचे दुःख आणि भीती दूर करेल. हनुमानाचे काही प्रभावी मंत्र देखील आहेत, ज्याचा जप केल्यानं तुम्हाला त्वरित लाभ मिळेल. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांच्याकडून हनुमानाच्या प्रभावी मंत्रांबद्दल जाणून घेऊया.
हनुमानाचे शक्तिशाली मंत्र - 1. नोकरी मिळविण्यातील अडथळे दूर करण्याचा मंत्र मर्कटेश महोत्साह सर्वशोक विनाशन. शनिवारी स्नान केल्यानंतर हनुमानाची पूजा करा, त्यानंतर या मंत्राची एक माळा किंवा किमान 108 वेळा जप करा. या मंत्राच्या प्रभावाने तुम्हाला नोकरी मिळण्यात जे काही अडथळे येत आहेत ते दूर होतात, असे मानले जाते.
2. शत्रूंचा पाडाव करण्यासाठी हनुमान मंत्र - तुम्ही तुमच्या शत्रूंमुळे त्रस्त आहात, ते तुम्हाला प्रत्येक पावलावर आव्हान देत आहेत. शत्रु लोक प्रत्येक कामात अडथळे निर्माण करत असतील तर हनुमानाची पूजा केल्यानंतर 'ओम हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट' या मंत्राचा जप करा. हनुमानाच्या आशीर्वादाने शत्रूंचा नाश होईल, त्यांचा पराभव होईल, तुमचा विजय होईल.
3. रोग आणि त्रास दूर करण्यासाठी मंत्र - हनुमानाचे नामस्मरण केल्यानं सर्व प्रकारचे रोग, दोष, भय इत्यादी दूर होतात. शनिवारी हनुमानाची पूजा केल्यानंतर ओम नमो हनुमते रूद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा, या मंत्राचा जप करा. या मंत्राचा जप केल्यानं तुम्ही रोगांपासून मुक्त व्हाल. संकट दूर होऊन शत्रूची भीती दूर होईल, असे मानले जाते.
4. कर्जमुक्तीसाठी हनुमान मंत्र - कर्जामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडली असेल आणि तुमच्यावर कर्जाचा बोजा सतत वाढत असेल तर त्या कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी ओम नमो हनुमते आवेशाय आवेशाय स्वाहा, या हनुमान मंत्राचा जप करा. संकटमोचन हनुमान तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यास मदत करतील.
5. सुख-शांतीसाठी हनुमान मंत्र - कुटुंबात सुख-शांती नांदण्यासाठी हनुमानाच्या ओम नमो भगवते हनुमते नम: या मंत्राचा जप करा. याच्या प्रभावाने घरातील कलह संपेल, जीवनात सुख-शांती येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)