3 आणि 2 या अंकांदरम्यान तडजोड आणि सेटलमेंटची परिस्थिती असते. जेव्हा या दोन जन्मांकाच्या व्यक्ती एकत्र काम करतात तेव्हा त्यांच्या कामगिरीवरून त्यांना जज करणं कठीण होतं.
या जन्मांकाच्या दोन व्यक्ती जोडीदार असल्यास त्यांना आपला वर्चस्ववादी स्वभाव नियंत्रित ठेवावा लागतो. शिवाय, त्यांनी सर्वोत्तम परिणामांसाठी एकसारख्या फायद्यांसाठी काम करणं गरजेचं आहे.
वेळेचा सर्वोत्तम आनंद घेण्यासाठी, दोनचा प्रभाव असलेल्या व्यक्तींनी निर्णय घेताना अंतर्ज्ञानाचा वापर केला पाहिजे आणि तीनचा प्रभाव असलेल्यांनी बिझनेसमध्ये काम करताना व्यापक सोशल नेटवर्क तयार केलं पाहिजे.
मेडिकल प्रॉडक्ट्स, शिक्षण, इंटिरिअर डेकोरेशन, संगीत, फूड प्रॉडक्ट्स, खेळ आणि इव्हेंट्स हे व्यवसाय 3 आणि 2 जन्मांकाच्या व्यक्तींसाठी जास्त चांगले ठरतात.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)