एक क्रमांकाला सूर्याची अतिशय मजबूत शक्ती मिळते. हा क्रमांक स्वतंत्र, आक्रमक, कठोर, अहंकारी आणि आत्मविश्वासपूर्ण गुणांनी भरलेला आहे.
तर, दोन या क्रमांकावर चंद्राचा प्रभाव असतो. त्यामुळे तो कोमलता, शुद्धता, लवचिकता, स्वाभिमान आणि निरागसपणा दर्शवतो.
क्रमांक दोनमधील कमकुवतपणा क्रमांक एकच्या ताकदीत रूपांतरित होतो आणि क्रमांक दोनची जी काही क्षमता आहे ती क्रमांक एकमध्ये सहज विलीन करता येते.
म्हणून दोन्ही संख्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आघाडीवर चांगल्या नातेसंबंधांचा आनंद घेतात, असं म्हणता येईल. या संख्या एकमेकांशी पूर्णपणे सुसंगत आहेत, असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो.
#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)