क्रमांक 8: ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्राच्या पुस्तकांमध्ये एक आणि आठ या दोन अंकाचं संयोजन सर्वांत जास्त लोकप्रिय आहे. मात्र, त्यांच्याबद्दल बोलणं जितकं सोपं तितकंच त्यांना हाताळणं कठीण आहे.
क्रमांक एकवर सूर्याचा तर क्रमांक आठवर शनीचा प्रभाव असतो. सूर्य हा शनिचा पिता आहे. असं म्हटलं जातं की, वडील आणि मुलाची ही जोडी दीर्घकाळ सोबत राहू शकत नाही.
ज्यांचा जन्मांक एक आहे आणि भाग्यांक आठ आहे त्यांना या दोन अंकांच्या संयोगाचा सामना करावा लागतो. या अंकाचा एकत्र प्रभाव असलेल्या व्यक्तींना नेहमी त्यांच्या जीवनाच्या मार्गात संघर्षाचा सामना करावा लागतो.
रिलेशनशीपमध्ये असलेल्या व्यक्ती गैरसमज, कठोरपणा, आरोग्यविषयक चिंता, वर्चस्व आणि आर्थिक आव्हानं या समस्यांनी ग्रस्त असतात.
एक आणि आठ क्रमांकाचा प्रभाव असलेल्या व्यावसायिक भागीदारांनी शंकर, शनी आणि सूर्याची पूजा केली पाहिजे. ज्या घरांच्या आणि प्लॉटच्या क्षेत्रफळात आठ अंकाचा समावेश आहे, अशा जागा खरेदी करणं टाळलं पाहिजे. कारण, आठ हा क्रमांक एक या अंकासाठी कष्ट आणि संथ प्रगती घेऊन येतो.
#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)