#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) महिलांनी किचनच्या पूर्वेकडच्या भिंतीवर सूर्यप्रतिमा लावावी. स्पर्धा आणि इंटरव्ह्यूमध्ये शैक्षणिक ज्ञान दाखवण्यासाठी चांगली वेळ. हीलिंग सेशन्सला जाण्यासाठी चांगला वेळ; मात्र सरकारी काँट्रॅक्ट्सवर स्वाक्षरी करू नये आणि इव्हेंट्स स्पॉन्सर करणं टाळावं. कायदेविषयक किंवा ऑफिशियल समस्या सोडवण्यासाठी मित्र किंवा नातेवाईकांना तुमच्या मजबूत पार्श्वभूमीच्या माध्यमातून मदत करा. अधिक आकर्षक दिसण्यासाठी चामड्याच्या वस्तू वापरणं टाळा. शुभ रंग : Yellow शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 3, 1 दान : मंदिरात कुंकू दान करा.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) खासकरून लव्ह रिलेशनशिप्ससाठी आजचा दिवस गुंतागुंतीचा असू शकतो. आज तुमची कागदपत्रं आणि गुडविलला धक्का लावण्याचा प्रयत्न कोणी तरी करण्याची शक्यता आहे. आज वैयक्तिक भांडणाचे मुद्दे विसरून तुम्ही करिअरकडे लक्ष द्यायला हवं, जेणेकरून तुमच्या प्रगतीचा वेग वाढेल. तुमचे भविष्यातले प्लॅन्स कोणाशी शेअर करणं टाळा. राजकीय नेत्यांनी कागदपत्रांवर सह्या करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. शुभ रंग : Sky Blue & Yellow शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2, 6 दान : आश्रमात भात दान करा.
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज काही स्वतःसाठी राखून ठेवा. आज अध्यात्म आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या सिक्स्थ सेन्सची क्षमता वृद्धिंगत करावी. त्यातून तुम्हाला प्रगतीच्या दिशेचा मार्ग दिसेल. तुमची स्टेजवरची उपस्थिती आज आकर्षक असेल. नाट्य कलावंतांनी कामाच्या ठिकाणी नवी सुरुवात जरूर करावी. नवी रिलेशनशिप सुरू होण्याची शक्यता. पब्लिक फिगर्स आणि वकील यांना नशीब साथ देईल. संगीतकार, डिझायनर्स, विद्यार्थी, वृत्तनिवेदक, राजकीय नेते, अभिनेते, कलावंत, गृहिणी, हॉटेलियर्स आणि लेखक यांच्या करिअरच्या प्रगतीच्या दृष्टीने काही विशेष घोषणेची शक्यता. शुभ रंग : Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : मुलांना पिवळ्या रंगाची कृत्रिम फुलं दान करा.
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज राहू मंत्र म्हणून दिवसाची सुरुवात करा. आरोग्य आणि भावना या दोन्हींची काळजी घ्या. पैसे मिळण्यास उशीर होण्याची शक्यता दिसते. हिरवे आणि लिंबूवर्गीय पदार्थ खाल्ल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील. बांधकाम, मशिनरी, धातू, सॉफ्टवेअर आणि ब्रोकर्स आदी बिझनेसमधल्या व्यक्तींनी आज करारावर सह्या करणं टाळावं. प्रोफेशनल लाइफ उत्तम असेल. आई-वडिलांना आपल्या मुलांचा अभिमान वाटण्याचा सुंदर अनुभव घेता येईल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 6 दान : गरिबांना लिंबं दान करा.
#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कामाच्या ठिकाणी घुबडाचं चित्र लावा. त्यामुळे शहाणपण वाढेल. तुमचे बॉस किंवा वरिष्ठ आज तुमच्या शब्दांनी प्रभावित होतील; मात्र तरीही अप्रैझल कमी असेल. इतरांच्या चुकांकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा दिवस आहे. आजचा दिवस प्रॉपर्टी किंवा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा आहे. कारण आर्थिक लाभ लवकरच मिळण्याचे संकेत आहेत. क्रीडापटू आणि ट्रॅव्हलर्सना चांगलं यश मिळेल. मीटिंगमध्ये नशिबाची साथ मिळण्यासाठी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्यास उपयुक्त ठरेल. आज तुमच्या आवडीच्या गोष्टी मिळण्याचा योग आहे. त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीला जरूर प्रपोझ करा. ग्लॅमर इंडस्ट्रीतल्या व्यक्तींना करिअरच्या सर्व बाजूंचा आनंद घेता येईल. शुभ रंग : Teal शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : गरिबांना पांढरं पीठ दान करा.
#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) चामड्याच्या पट्ट्याऐवजी धातूचा चंदेरी पट्टा असलेलं घड्याळ बांधा. वेदनेचं कारण नष्ट करणं गरजेचं आहे. अन्यथा अधिक संकटं येतील. आज तुमच्या मनावर रोमान्स आणि प्रॉमिसेसच्या भावनेचं राज्य असेल; मात्र फसवणूक आणि विश्वासघातापासून सावध राहा. बिझनेस आणि नोकरीत चांगली प्रगती होईल; मात्र आज वैयक्तिक समस्या अधिक गुंतागुंतीच्या असतील. त्यामुळे आज वादांपासून दूर राहा. एकाच वेळी भरपूर जबाबदाऱ्या खांद्यावर घेणं टाळा. कारण तुम्ही एकाच वेळी सर्वांना खूश करू शकत नाही हे लक्षात ठेवा. हॉटेल व्यावसायिक, ट्रॅव्हलर्स, ज्वेलर्स, अभिनेते, जॉकी आणि डॉक्टर्सना आपली कौशल्यं दाखवण्याची संधी मिळेल. कारण आजचा दिवस त्यांच्यासाठी लकी आहे. खेळाडूंनी आपल्या प्रशिक्षकांचं मार्गदर्शन घ्यावं. कारण ते भविष्यात उपयोगी ठरेल. शुभ रंग : Peach शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : मैत्रिणीला किंवा वयाने मोठ्या असलेल्या महिलेला बांगड्या दान करा.
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) घरगुती कामांमध्ये अति वाहून घेऊ नका. अन्यथा खूप ताण येऊ शकेल. वकील, सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, विद्यार्थी, खेळाडू आणि सीए यांच्यासाठी उत्तम दिवस. तुमचे नेतृत्वगुण आणि विश्लेषण कौशल्य ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्यं आहेत. आर्थिक निर्णयांमध्ये शहाणपणाचा वापर करा. वाद टाळा. कारण त्यामुळे तुमच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल. तुमच्या प्रामाणिकपणाचं फळ म्हणून तुम्हाला लव्ह रिलेशनशिपमध्ये विश्वास आणि आदर मिळेल. आज ऑडिट गरजेचं आहे. कागदपत्रांवर विश्वास ठेवू नये. कोर्ट, थिएटर, टेक्नॉलॉजी, सरकारी कंत्राट, रिअल इस्टेट, शाळा, इंटेरियर आणि धान्य या व्यवसायांशी संबंधित व्यक्तींसाठी चांगला दिवस. भागीदारीमध्ये नसाल तोपर्यंत बिझनेसविषयक संबंध हेल्दी राहतील. शुभ रंग : Yellow & Green शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : गरिबांना नाणं दान करा.
#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) शनिमंत्राचा जप करा आणि त्यांच्याप्रमाणेच कृतींमध्ये प्रामाणिक राहा. दैनंदिन असाइनमेंट्समधल्या अडचणी सोडवण्यात व्यग्र असाल. अल्पकालीन उद्दिष्टं साध्य होतील; मात्र दीर्घकालीन उद्दिष्टांची फेररचना करावी लागेल. आरोग्याची काळजी घेण्याचा आणि हेल्दी जीवनशैली अंगीकारण्याचा काळ. फॅमिली फंक्शन्स, प्रेझेंटेशन्स, सरकारी करार किंवा इंटरव्ह्यू आदींना आज आवर्जून उपस्थिती लावली पाहिजे. आज कुटुंबीयांसमवेत वेळ व्यतीत करायलाच हवा. लाँग ड्राइव्ह टाळा. आज अध्यात्मसाधनेची ताकद वाढवा आणि प्रेमाची नाती बळकट करा. शुभ रंग : Sea Blue & Brown शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : मंदिरात किंवा गरिबांना काळे तीळ दान करा.
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) पाउचमध्ये लाल धान्य ठेवा आणि संबंधित अंकाची ऊर्जा मिळण्यासाठी ते कायम तुमच्यासोबत ठेवा. लोकप्रियता हा तुमच्या कामाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा कायमच घटक राहिला आहे; पण आकर्षकपणा वाढण्यासाठी आज लोकांमध्ये मिसळा. माध्यमं, खेळ, बांधकाम, वैद्यकीय, राजकारण आणि ग्लॅमर या क्षेत्रांतल्या व्यक्ती नवी उंची गाठतील. बिझनेस किंवा जॉबसाठी फॅमिली कनेक्शन्सचा उपयोग करण्याकरिता चांगला दिवस. कारण चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसाची सुरुवात करताना लाल रंगाचे कपडे घालावेत. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9, 6 दान : आश्रमात गहू दान करा. 7 मार्च रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : अनुपम खेर, राधिका पंडित, अर्णब गोस्वामी, साधना सरगम, गुलाम नबी आझाद, असफ जाह द्वितीय