#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) एखादी नवीन संधी किंवा सल्ला मिळाल्यास तो मोकळ्या मनाने स्वीकारा. कायदेशीर प्रकरणं सोडवण्यासाठी कौटुंबिक ओळखीचा वापर कराल. अभिनेत्यांनी समोरून आलेली ऑफर सोडू नये. आकर्षण वाढवण्यासाठी चामड्याच्या वस्तू वापरणं टाळा. जेवणामध्ये पिवळ्या धान्याचा वापर करा, ज्यामुळे सूर्याप्रमाणे तुमचेही तेज कायम राहील. शुभ रंग : Orange शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 आणि 7 दान : कृपया आश्रमात पिवळा भात दान करा.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज मनातील रोमँटिक भावनांना आवर घालणं गरजेचं आहे. बिझनेसमधील कमिटमेंट आरामात पूर्ण कराल. पार्टनरशिप फर्म असणाऱ्यांनी अकाउंटचं ऑडिट करणं गरजेचं आहे. मुलांसंबंधी कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका. राजकारणी व्यक्तींनी कागदपत्रांवर सही करताना खबरदारी घेणं गरजेचं आहे. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 आणि 6 दान : कृपया गरिबांना पांढरा तांदूळ दान करा.
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) दिलेलं काम वेळेत पूर्ण करण्याचा तुमचा स्वभाव आहे, आणि हीच गोष्ट तुम्हाला यशस्वी होण्यास मदत करेल. एखादं नवीन नातं तयार होऊ शकतं. नशीब तुमच्या सोबत असेल, मात्र मित्रांसोबत असताना आपल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेण्याचा विचार करू नका. डिझायनर, राजकारणी, अभिनेते, कलाकार, गृहिणी, हॉटेल व्यावसायिक आणि लेखक या व्यक्तींना आज करिअर संबंधी एखादी चांगली बातमी मिळेल. शुभ रंग : Red शुभ दिवस : गुरूवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया गरजूंना पिवळं मोहरीचे तेल दान करा.
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) दिवसाची सुरूवात सेल्फ हीलिंगने करा. डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत आजचा दिवस खडतर आहे. तुमच्या सहकाऱ्याकडून विश्वासघात होऊ शकतो. हिरवी धान्यं दान केल्यास फायदा होईल. बांधकाम, मशिनरी, मेटल, सॉफ्टवेअर आणि ब्रोकिंग अशा बिझनेसमध्ये असलेल्या व्यक्तींनी आज कोणत्याही अॅग्रीमेंटवर सही करणं टाळावं. पालकांना आपल्या पाल्याचा अभिमान वाटेल. जोडप्यांमध्ये प्रेम वाढेल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 आणि 6 दान :
#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज भरपूर संधी आणि ओळख मिळेल. तुमच्या केलेल्या कामाबद्दल कौतुक आणि रिवॉर्ड मिळवण्याचा आजचा दिवस आहे. आज शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल. टेक्नॉलॉजी क्षेत्रातील व्यक्ती आणि ट्रॅव्हलर असणाऱ्या व्यक्तींसाठी भाग्याचा दिवस. मीटिंगमध्ये हिरव्या रंगाचे कपडे घालून गेल्यास नशीब चमकेल. आपल्या प्रियकर वा प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी आज अगदी उत्तम दिवस आहे. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान :
# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज मनामध्ये रोमँटिक विचार राहतील, तरीही तुम्हाला विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागेल. मनःशांती मिळावी यासाठी स्वतःच प्रयत्न करणं गरजेचे आहे हे लक्षात घ्या, आणि मेडिटेशन करा. तुम्ही एकाच वेळी सर्वांना खुश नाही करू शकत, त्यामुळे आपल्या खांद्यावर भरपूर जबाबदाऱ्या घेणे टाळा. अभिनेते आणि डॉक्टरांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल, आजचा दिवस या व्यक्तींसाठी भाग्याचा आहे. वडील आपल्या मुलांना भविष्यासाठी मार्गदर्शन करतील, जे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरेल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया चांदीचं नाणं दान करा.
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस संमिश्र असा आहे. काही चांगल्या गोष्टी घडतील, काही वाईट गोष्टीही घडतील; त्यामुळे दोन्हीसाठी तयार राहा. कामाच्या ठिकाणी बॉससोबत चर्चा टाळा. नातेसंबंधांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल, ज्यामुळे ताण वाढेल. आज कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी नीट वाचून घ्या. सरकारी अधिकारी, रिअल इस्टेट, शाळा, इंटिरिअर, धान्य या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी मात्र उत्तम दिवस. तुम्ही वाद घालणं टाळलं, तर बिझनेस संबंध चांगले राहतील हे लक्षात घ्या. शुभ रंग : Orange शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया आश्रमांमध्ये पिवळ्या डाळी दान करा.
#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आपल्या मनातील भावना आणि भविष्यातील योजना जोडीदाराला सांगण्यासाठी उत्तम दिवस. बिझनेस व्यवहार रखडतील, मात्र दुपारच्या जेवणानंतर केलेले व्यवहार यशस्वी होतील. अॅग्रीमेंट किंवा मुलाखतीला आवर्जून उपस्थित रहा. निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ व्यतीत करा. आज कृपया प्रवास टाळा. जोडप्यांसाठी आज नात्यातील रोमान्स वाढवण्यासाठी उत्तम दिवस. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया वासरांना हिरवे धान्य दान करा.
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आपला जोडीदार आणि कुटुंबातील इतर व्यक्तींची काळजी घ्या. आज तुमची दिशाभूल होण्याची शक्यता आहे. खेळाशी संबंधित बिझनेस, मनोरंजन, रिअल इस्टेट, शेअर मार्केट, स्टार्टअप किंवा पॉलिटिक्स अशा व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. अभिनेत्यांना मोठे यश मिळेल. दिवसाच्या सुरूवातीला लाल रंगाचे कपडे घालणे गरजेचे आहे. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 आणि 6 दान : कृपया महिलांना केशरी रंगाचे कापड दान करा. 6 मार्च रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : श्रवणानंद, कृष्णा कुमारी, अंकित तिवारी, जान्हवी कपूर, मकरंद देशपांडे, राज एन. सिप्पी.