#क्रमांक 9: नऊ ही एक परिपूर्ण संख्या आहे, जी क्रमांक चारसाठी भाग्यवान आणि निष्ठावान मानली जाते. या दोन्ही जन्मांकांच्या व्यक्तींमध्ये नेहमीच एक आकर्षण असतं. त्यामुळे या व्यक्ती करत असलेल्या कामाचा सर्वोत्तम परिणाम होतो.
4 क्रमांकाच्या व्यक्ती साधारणपणे 9 अंकाकडे कल असणाऱ्या असतात, त्यामुळे त्या गाडीचा क्रमांक निवडतानाही त्याची बेरीज 4 किंवा 9 येते का, हे तपासून ते गाडीचा क्रमांक निवडतात.
या दोन्ही अंकांमध्ये असलेल्या आकर्षणामुळे या व्यक्ती एकमेकांकडे प्रत्यक्षही आकर्षित होऊ शकतात. त्यांनी एकत्र काम केलं तर खूपच फायद्याचं ठरू शकतं. या दोन्ही अंकांचा प्रभाव असलेल्या व्यक्तींनी नेहमी एकत्र राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून ते एकमेकांच्या कमकुवतपणावर मात करू शकतील.
चार आणि नऊ जन्मतारीख असलेली जोडपी उत्कृष्ट, प्रामाणिक, विश्वासार्ह, प्रभावी आणि प्रेमळ असतात. या अंकांचा प्रभाव असलेल्या व्यक्तींनी राहु आणि मंगळ मंत्राचा जप केला पाहिजे. या मंत्रांच्या जपामुळे त्यांना मानसिक समधान तर मिळेलच पण त्याचबरोबर त्यांच्या दैनंदिन अडचणी सुटण्यासही मदत होऊ शकते.
या व्यक्तींनी आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी टोमॅटो किंवा डाळिंबासारखी लाल फळं खाल्ली पाहिजेत. याशिवाय, योगासने किंवा जिमिंगसारख्या शारीरिक व्यायामामध्ये त्यांचा काटेकोरपणे अवलंब केला पाहिजे.
वित्त, समुपदेशन, शिक्षण, शेअर बाजार, यंत्रसामग्री, गॅस वेसल्स, सल्लागार आणि क्रीडा उद्योगात असलेल्या चार आणि नऊ जन्मांकांच्या व्यक्तीचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. या दोन्ही अंकांचा प्रभाव असलेल्या महिलांनी मेडिटेशन आणि हिलिंगमध्ये स्वतःला गुंतवून ठेवलं पाहिजे. नाहीतर त्यांच्या जोडीदाराला त्रास होण्याची शक्यता असते.