मेष : ज्योतिष शास्त्रानुसार ज्यांची राशी मेष आहे त्यांनी हिरा घालू नये. हिरा धारण केल्याने या लोकांच्या अडचणी आणखी वाढतात. यासोबतच मेष राशीच्या लोकांना पैशाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते.
वृश्चिक: ज्या लोकांची राशी वृश्चिक असते, त्यांचा स्वामी मंगळ ग्रह असतो. हिरा हा शुक्राचा कारक मानला जातो आणि मंगळ आणि शुक्र यांच्यात मैत्री जमत नाही. वृश्चिक राशीच्या लोकांनी हिरा धारण केला तर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय हिरा घालू नका.
कर्क राशीचे लोक : ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांना हिरा मानवत नाही. कर्क राशीच्या लोकांनी हिरा धारण केला तर त्यांना नशीब प्रत्येक कामात दगा देतं. कर्क राशीच्या कुंडलीत शुक्राची महादशा चालू असेल तर त्याने ज्योतिषी किंवा रत्नशास्त्रज्ञाच्या सल्ल्यानेच हिरा धारण करावा.
मीन राशीचे लोक: ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांची राशी मीन आहे त्यांनी हिरा घालू नये, कारण शुक्र हा मीन राशीच्या तिसऱ्या आणि आठव्या घराचा स्वामी मानला जातो, त्यामुळे हिरा घालणे त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
सिंह राशीचे लोक : ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांची राशी सिंह आहे, त्यांनीही हिरा घालणे टाळावे. सिंह राशीच्या लोकांनी हिरा धारण केला तर त्यांची धनहानी होऊ शकते. यासोबतच त्यांना अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आयुष्यात अनेक अपयश बघावे लागेल.