हिंदू धर्मात असे म्हटले जाते की, सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी आपण जे काही काम केले त्याचा प्रभाव आपल्या जीवनात नक्कीच दिसून येतो. शास्त्रानुसार जर आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचार आणि चांगल्या गोष्टींनी केली तर जीवनातही सकारात्मकता येते.
ज्योतिष शास्त्रात असे काही मंत्र सांगितले आहेत, ज्याचा जप सकाळी उठल्यानंतर केल्यानं संपूर्ण दिवस चांगला जातो. यासोबतच या मंत्रांचा जप केल्याने केलेल्या कार्यात यश मिळण्याची शक्यता वाढते. याविषयी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत आहेत, जाणून घेऊया अशा काही मंत्रांबद्दल ज्याचे सकाळी पठन केल्यानं तुमचा दिवस चांगला होऊ शकतो.
हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की कोणत्याही व्यक्तीने सकाळी उठून सर्व प्रथम आपले दोन्ही हात जुळवून आपले तळहात पाहावेत. असे मानले जाते की, सर्व देवी-देवता मानवाच्या तळहातावर वास करतात. यासोबतच खालील या मंत्राचाही जप करावा.
अर्थ - या मंत्राचा अर्थ तळहातांच्या पुढच्या भागात माँ लक्ष्मी, मधल्या भागात माँ सरस्वती आणि मूळ भागात भगवान परब्रह्म गोविंद वास करतात. मी सकाळी त्यांचे दर्शन करतो.
अर्थ - हे माते, तुझ्या प्रसादाने मनुष्य सर्व संकटांतून मुक्त होऊन धन, धान्य व पुत्रप्राप्ती होईल, यात शंका नाही. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)