मिथुन : सिंह राशीतील बुधाचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. नोकरी आणि बिझनेस दोन्हीसाठी वेळ चांगला राहील. नोकरदार लोकांना पदोन्नतीचा लाभ मिळू शकतो, त्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होईल. उत्पन्न वाढल्याने तुम्ही अधिक बचत करू शकाल. कामाचे टेन्शन राहणार नाही.
बुध ग्रहाच्या प्रभावाने तुमची तर्कशक्ती आणि निर्णय क्षमता वाढू शकते. तुमचा आत्मविश्वास वाढेल. 69 दिवसांत तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करू शकता किंवा त्यात गुंतवणूक करू शकता. कौटुंबिक जीवन आनंदी आणि शांत असेल.
सिंह : बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळेल. सध्या तुमचे लक्ष अधिकाधिक पैसे कमावण्यावर असेल. करिअरमध्ये प्रगतीसाठी चांगला काळ. प्रत्येकजण तुमच्या नेतृत्वाची आणि निर्णय क्षमतेची प्रशंसा करेल. कामात यश मिळेल. करिअरमध्ये मोठी झेप घेण्यासाठी वेळ अनुकूल आहे.
आर्थिक बाजू थोडी कमजोर राहू शकते आणि तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करू शकता. यावेळी वैवाहिक जीवन चांगले राहील. जे लोक प्रेमसंबंधात आहेत, त्यांचे प्रेम जीवन आनंददायी असू शकते. लाइफ पार्टनरशी बॉन्डिंग उत्तम राहील.
धनु: बुधाच्या संक्रमणामुळे तुमच्या राशीच्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. सध्याच्या नोकरीत तुम्हाला परदेशात जावे लागू शकते. परंतु, कामातील असंतोष हे नोकरी बदलण्याचे प्रमुख कारण बनू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होईल. ते त्यांच्या कार्याचा विस्तार करू शकतात. मात्र, आपल्याला इतर लोकांकडून कठोर स्पर्धा देखील मिळू शकते. व्यवसायात यश मिळविण्यासाठी नवीन योजना आखू शकता. यामध्ये तुम्हाला यशही मिळू शकते.