advertisement
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / 21,000 केळींनी मारुतीच्या मंदिराची आरास; विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

21,000 केळींनी मारुतीच्या मंदिराची आरास; विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

Alija Sarkar Indore: प्रसिद्ध श्री वीर अलीजा हनुमान मंदिरात 21,000 केळींनी मारुतीची विशेष आरास करण्यात आली होती. इतक्या केळींची आरास पाहण्यासाठी मंगळवारी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. संपूर्ण मंदिर परिसर केळीने सजवण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी ही केळी गरजू आणि गरिबांमध्ये वाटण्यात आली.

01
मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये वीर अलीजा हनुमान मंदिर आहे. हे मंदिर सुमारे 500 वर्षे जुने आहे. लाखो लोकांची श्रद्धा या मंदिराशी जोडलेली आहे. वीर अलीजा हनुमान मंदिरात दर मंगळवारी देवाला नारळ, मोगरा आणि सोन्याच्या दागिन्यांनी विशेष सजावट केली जाते.

02
वीर अलीजा हनुमानाचे हे सुंदर रूप पाहण्यासाठी पहाटेपासूनच हजारो भाविक वीर बागीची येथे जमतात आणि सायंकाळी हजारो भाविक महाआरतीत सहभागी होऊन वीर अलीजा हनुमानाचे दर्शन व प्रसाद घेतात.

03
मंगळवारी प्रसिद्ध श्री वीर अलीजा हनुमान मंदिरात 21 हजार केळींनी खास सजावट करण्यात आली होती. आरास पाहण्यासाठी इंदूरच्या विविध भागातील शहरवासी पोहोचले. ही वाटिका दर्शनाबरोबरच आकर्षणाचे केंद्रही होती.

04
मंदिराचे पवनानंद महाराज म्हणाले की, आता दर 2 महिन्यांनी तीज किंवा विशेष सणाला वीर अलीजा सरकार परिसरात फळांनी अशी सजावट करण्याचा मानस आहे. त्यानंतर गरजूंना फळांचे वाटप केले जाईल. या वेळीही 25 जणांचे वेगवेगळे पथक बुधवारी शहरातील विविध भागात या फळांचे वाटप करण्यासाठी गेल्याचे त्यांनी सांगितले.

  • FIRST PUBLISHED :
  • मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये वीर अलीजा हनुमान मंदिर आहे. हे मंदिर सुमारे 500 वर्षे जुने आहे. लाखो लोकांची श्रद्धा या मंदिराशी जोडलेली आहे. वीर अलीजा हनुमान मंदिरात दर मंगळवारी देवाला नारळ, मोगरा आणि सोन्याच्या दागिन्यांनी विशेष सजावट केली जाते.

    MORE
    GALLERIES