जय बजरंगबली! शनिवारी मारूतीच्या मंदिरात नमस्कार करताना म्हणावेत हे मंत्र
Hanuman Mantras: देशभरात अनेक ठिकाणी शनिवारी हनुमानाची पूजा केली जाते. बजरंगबलीचे भक्त नियमित शनिवारी मंदिरात जाऊन मारूतीची पूजा करतात. गावोगावी शनिवारी हनुमानाचे मंदिर भाविकांनी गजबजलेले दिसते. पंडित शक्ति जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हाही आपण मारुतीच्या देवळात जातो, त्यावेळी देवाला वंदन करताना काही मंत्राचा उच्चार करणे लाभदायी ठरते, यामुळे भक्तांवरील संकट दूर होते असे मानले जाते. हनुमानाला नमस्कार करताना कोणते मंत्र म्हणावेत याविषयी जाणून घेऊया.