स्वप्न विज्ञान मानते की, प्रत्येक पडणारे स्वप्न आपल्याला आपल्या भविष्यात घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट घटनांबद्दल काही संकेत देते. स्वप्नात लग्न पाहण्याचा अर्थ काय, याविषयी दिल्लीचे ज्योतिषाचार्य पंडित आलोक पंड्या अधिक माहिती देत आहेत.
स्वप्नात स्वतःचे लग्न पाहणे - स्वप्न शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात स्वतःचे लग्न झालेले दिसले तर ते त्याच्यासाठी अशुभ असते. स्वप्नात स्वतःला लग्न करताना पाहणे हे सूचित करते की, भविष्यात तुमच्या आयुष्यात काही मोठी घटना घडणार आहे. अशा स्थितीत सतर्क राहण्याची गरज आहे.
इतरांचे लग्न पाहणे - अनेकवेळा आपण स्वप्नात आपल्या कोणत्याही मित्राचे किंवा नातेवाईकांचे लग्न झालेले पाहतो. स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही तुमच्या कोणत्याही मित्राचे किंवा नातेवाईकाचे लग्न पाहिल्यास ते तुमच्यासाठी अशुभ संकेत आहे.
इतरांच्या लग्नाचे स्वप्न तुम्हाला सूचित करते की, आगामी काळात तुमच्या महत्त्वाच्या कामात काही अडथळे येणार आहेत, यासाठी तुम्ही आत्तापासूनच सावध राहण्याची गरज आहे.
स्वप्नात लग्नाची वरात पाहणे - स्वप्न शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात स्वतःच्या लग्नाची वरात दिसली तर ती त्या व्यक्तीसाठी शुभ मानली जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, आगामी काळात समाजात तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. ज्यामुळे तुम्हाला चांगले आर्थिक आणि मानसिक लाभ मिळू शकतात. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)