सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 21 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) एखादी गोष्ट हाताबाहेर जात असल्याचे संकेत मिळतील. आगामी मुलाखतीची चिंता वाटत असेल, तर काळजी करू नका. सर्व काही सुरळीत पार पडेल. पावसाच्या दिवसासाठी तयार रहा. LUCKY SIGN – Stationary
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) एखाद्या स्वप्नाचा विचार दिवसभर मनात राहील. नवीन दिशेने आत्ता केलेले छोटे प्रयत्नही फायद्याचे ठरतील. काम आणि करिअरच्या बाबतीत नातेवाईक सल्ला देतील. LUCKY SIGN – A Silk Scarf
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) जर घाई कराल, तर तुमची तयारी अपूर्ण राहील. अगदी शेवटच्या क्षणी वाटणारी चिंता व्यत्यय आणू शकेल. एका वेळी एकच गोष्ट करण्यावर भर द्या. मेडिटेशन केल्याने फायदा होईल. LUCKY SIGN – A Large Mirror
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) काही लोकांचा तुमच्यावर नकारात्मक प्रभाव पडेल, मात्र तरीही त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची तुम्हाला इच्छा होईल. मन शांत करण्यासाठी, तसेच विचार सुरळीत करण्यासाठी चालायला जाणं फायद्याचं ठरेल. एखाद्या गोष्टीचं आगाऊ नियोजन करणं फायदेशीर ठरेल. LUCKY SIGN – A Copper Vessel
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुमचं स्वप्न किंवा इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने एखाद्या गोष्टीसाठी अर्ज करणार असाल, तर आजचा दिवस अगदी भाग्याचा आहे. आज भरपूर लोकांशी संवाद साधणे टाळा, अन्यथा गोंधळ निर्माण होऊ शकतो. LUCKY SIGN – A Red Coral
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) भूतकाळात तुम्ही स्वतःला जे प्रॉमिस केलं होतं, ते पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे. आधी घडलेल्या घडामोडी सारख्याच पॅटर्नमध्ये पुन्हा घडताना दिसतील. तुमचा भाऊ किंवा बहीण एखाद्या घरगुती अडचणींचा सामना करत आहेत. LUCKY SIGN – A Souvenir
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) दैनंदिन कामं वेळेत पूर्ण न केल्यामुळे चिडचिड होऊ शकते. अशा वेळी ही कामं टप्प्याटप्प्याने करणं फायद्याचं ठरेल. इतर लोकांनी तुम्हाला योग्य प्रकारे समजून घ्यावं यासाठी योग्य कम्युनिकेशन डिझाईन तयार करा. LUCKY SIGN – A Ceramic Bowl
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) आजचा दिवस अगदी उत्साहाचा आहे. एखादी सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता असल्यामुळे या उत्साहात आणखी भर पडेल. कामाच्या ठिकाणी स्पर्धेला सामोरं जावं लागेल. LUCKY SIGN – A Terracotta Basin
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) एखादं काम करायचं की नाही याबाबत स्पष्टता येईल. तुम्ही ते काम पूर्ण करण्याचा निर्णय घ्याल. विचारांच्या स्पष्टतेला प्राधान्य द्याल. तुमचं सोशल स्टेटस जपण्याच्या दृष्टीने काम कराल. LUCKY SIGN – A Monument
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) जर तुमच्या भावंडांशी तुमचा वाद असेल, तर त्यामध्ये अधिक भर घालणं सध्या टाळा. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली एखादी बोलणी घडून येतील. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळेल. मित्र निवडताना काळजी घ्या. LUCKY SIGN – A Riddle
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) दिनचर्येतील कामं एका लयीत पूर्ण कराल. एखादी अनपेक्षित बातमी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. एखाद्या नवीन क्रीडा प्रकारात रस निर्माण होईल. LUCKY SIGN – A Dessert of Choice
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) कामाच्या ठिकाणी योग्य समतोल साधता येईल. तुमच्या टीममधील वरिष्ठ व्यक्ती आवश्यक मार्गदर्शन करतील. भूतकाळातील अनुभवांमुळे कोणावरही लवकर विश्वास ठेवणं कठीण जाईल. LUCKY SIGN – A New Car