चंद्रग्रहणाची आख्यायिका - चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेलाच होते. पौराणिक कथेनुसार, जेव्हा राहू-केतू पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला गिळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याला चंद्रग्रहण म्हणतात. ग्रहणाच्या 9 तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टीकोनातून तो अशुभ मानला जातो. म्हणूनच चंद्रग्रहणाच्या काळात काही कामे करू नयेत. पण, काही कामे अशी आहेत, जी केल्याने या काळात तुम्हाला ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते.
चंद्रग्रहणाच्या वेळी या मंत्रांचा जप करा - - ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम: हा वैभव लक्ष्मीचा मंत्र आहे, या मंत्राचा 108 वेळा जप केल्यास देवी लक्ष्मीची कृपा व्यक्तीवर राहते.
- ॐ ह्रीं बगलामुखी सर्व दुष्टानाम वाचं मुखम पदम् स्तम्भय। चंद्रग्रहणाच्या वेळी बागलमुखी मातेच्या मंत्राचा जप करू शकता. असे केल्याने शत्रूंपासून मुक्ती मिळते.
- चंद्रग्रहणाच्या वेळी धार्मिक मंत्रांचा जास्तीत जास्त जप करावा आणि देवाचे स्मरण करावे. तुम्ही गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र किंवा इतर मंत्रांचा जप करू शकता.
- ॐ श्रीं श्रीं चन्द्रमसे नम:। चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्रदेवाच्या या मंत्रांचा जप करा, असे केल्याने चंद्र दोषाचा प्रभाव कमी होतो. यासोबतच कुंडलीतील चंद्राचा त्रास कमी होतो.
- चंद्रग्रहण काळात शिव चालिसाचे पठण करावे. त्यामुळे ग्रहणाचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)