चैत्र विनायक चतुर्थी 2023 - पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवार, 24 मार्च रोजी दुपारी 04.59 वाजता सुरू होत आहे. चतुर्थी तिथी 25 मार्च, शनिवार, संध्याकाळी 04:23 पर्यंत आहे. उदयतिथीनुसार चैत्रातील विनायक चतुर्थी 25 मार्चला आहे. या दिवशी पंरपरेनुसार उपवास आणि गणेशपूजा करावी.
चैत्र विनायक चतुर्थी 2023 पूजा मुहूर्त - चैत्राच्या विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त 11:14 पासून आहे. या दिवशी तुम्ही सकाळी 11:14 ते दुपारी 01:41 पर्यंत गणेशाची पूजा करू शकता.
विनायक चतुर्थी व्रत रवि योगात - विनायक चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी रवि योग तयार होत आहे. हा रवियोग सकाळी 06:20 ते दुपारी 01:41 पर्यंत आहे. या दिवशी पूजा मुहूर्त संपेपर्यंत रवि योग असेल. रवि योगात पूजा करणे शुभ राहील. या योगात सूर्याचा प्रभाव जास्त असतो.
विनायक चतुर्थीचा चंद्र - विनायक चतुर्थी उपवासाच्या दिवशी चंद्रोदय सकाळी 08.31 वाजता होईल. शुक्ल पक्षात सकाळी चंद्र उगवेल.
चतुर्थीला भद्रकाळ - यंदा चैत्रातील विनायक चतुर्थीला भद्रकाळ आहे. या दिवशी भद्रकाळ सकाळी 06:20 वाजता सुरू होतो आणि संध्याकाळी 04:23 वाजता समाप्त होईल. भद्राच्या वेळी मांगलिक कार्य केले जात नाही. पण, गणेशाची पूजा करायला अडचण नाही. ही भद्रा स्वर्गाची आहे, तिचा मृत्यूलोकात जगावर म्हणजे पृथ्वीवर परिणाम होत नाही.