पुण्यातील हडपसर येथे शाळेच्या बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. अँजल मिकी मिनी शाळा येथील आवारात शाळेच्या बसला आग लागली. अग्निशमन दलाकडून आगीवर वेळीच नियंत्रण आणल्याने मोठा धोका टळला आहे. ही घटना दुपारी घडली. शाळेला सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.