तब्बल 2 दिवस त्यांचा मृतदेह राहत्या घरात पडून होता. त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. शिवाय दुर्गंधीही येत होती.
महाजनी जर एकटे राहत असतील तर त्यांच्यासोबत कोणी केअर टेकर नव्हता का? किमान स्वयंपाक किंवा घरकाम करणारंही कोणी होतं की नव्हतं? दोन दिवसात कोणाशीच त्यांचा संपर्क कसा झाला नाही?
याशिवाय रविंद्र महाजनी काही महिन्यांपासून पुण्याच्या घरात एकटेच राहत असल्याचंही सांगितलं जात आहे.
एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीचा सर्वात मोठा अभिनेता आणि हँडसम हंक अशी ओळख असलेल्या अभिनेत्याने अशा प्रकारे एग्झिट घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीचा सर्वात मोठा अभिनेता आणि हँडसम हंक अशी ओळख असलेल्या अभिनेत्याने अशा प्रकारे एग्झिट घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे.