पुणे, वैभव सोनवणे : पुण्यात आज सकाळी मोठी दुर्गघटना घडली आहे. कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी येथे गोडाऊनमधे भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात मोठे धुराचे लोळ उठले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकुण १२ अग्निशमन वाहने घटनास्थळी रवाना. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या आगीचं नेमकं कारण समजून शकलं नाही, या आगीत दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे.