advertisement
होम / फोटोगॅलरी / पुणे / तुमच्या सोसायटीमध्ये तयार करू शकता जळणारं इंधन, पुणेकर महिलेनं बनवलं खास यंत्र

तुमच्या सोसायटीमध्ये तयार करू शकता जळणारं इंधन, पुणेकर महिलेनं बनवलं खास यंत्र

पुण्यातल्या संशोधिकेनं बनवलेल्या तंत्रज्ञानामुळे घरीच इंधन तयार करता येणार आहे.

  • -MIN READ | Local18 Pune,Maharashtra
01
 कोळसा हे अनेक वर्षांपासून चालत आलेले पारंपारिक इंधन आहे. लाकडापासून बनवला जाणारा कोळसा बनवणे म्हणजे प्रदूषण आणि पर्यावरणाला हानी असे समीकरण तयार झाले आहे. या समीकरणाला छेद देत संशोधिका डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांनी एक नवं तंत्रज्ञान विकसित केलंय. हे तंत्रज्ञान शास्त्रशुद्ध आणि निसर्गपूरक असून त्यामुळे प्रदुषणाशिवाय कोळशाची निर्मिती करता येणार आहे.

कोळसा हे अनेक वर्षांपासून चालत आलेले पारंपारिक इंधन आहे. लाकडापासून बनवला जाणारा कोळसा बनवणे म्हणजे प्रदूषण आणि पर्यावरणाला हानी असे समीकरण तयार झाले आहे. या समीकरणाला छेद देत पुण्यातल्या संशोधिका डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांनी एक नवं तंत्रज्ञान विकसित केलंय. हे तंत्रज्ञान शास्त्रशुद्ध आणि निसर्गपूरक असून त्यामुळे प्रदुषणाशिवाय कोळशाची निर्मिती करता येणार आहे.

advertisement
02
डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांची पदार्थ विज्ञान या विषयामध्ये पीएचडी झाली आहे. वेगवेगळ्या पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे त्या जनजागृती करतात. जैविक इंधन या विषयाचा अनेक वर्षे अभ्यास करून त्यांनी हे पर्यावरणपूरक कोळसानिर्मितीचे तंत्रज्ञान विकसित केलंय. या तंत्रत्रानानं शेतातील, शहरातील बागांमधील काडीकचऱ्याचे कोळशामध्ये रूपांतर करता येते. हे करत असताना हवामान बदल या विषयाकडं प्रामुख्यानं लक्ष दिलंय, असं डॉ. प्रियदर्शनी यांनी सांगितलं.

03
या तंत्रज्ञानासाठी त्यांनी सोप्या पद्धतीच्या भट्टीची रचना केलीय. यामध्ये जैविक कचरा प्रत्यक्षात तापवला जातो. त्यामधून बाहेर पडणारा प्रदूषक गॅस पूर्णपणे जाळून टाकला जातो. त्यामुळे कोणत्याही प्रदूषणाविना निसर्गपूरक पद्धतीने कोळशाची निर्मिती होते, असे यामागचे विज्ञान आहे. त्याचबरोबर कोळशावर चालणाऱ्या कुकरचीसुद्धा त्यांनी निर्मिती केली आहे.

04
घरच्या घरी इंधन या उपक्रमाद्वारे कोळसानिर्मितीसाठी उपकरणे पुरवणे, संबंधित तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे यासाठी डॉ. प्रियदर्शनी काम करत आहेत. या प्रकल्पावर त्यांचे राजस्थान, आंध्रप्रदेश तसेच मेघालय या राज्यांमध्ये काम चालू आहे. यामध्ये लोकांना प्रशिक्षण देणे, काडीकचऱ्यापासून कोळसा तयार करणे, या कोळशापासून वेगवेगळी उत्पादनं बनवणं तसेच त्यातून रोजगारनिर्मिती करणे असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे.

05
पुण्यामध्ये काही हाऊसिंग सोसायटींनी हा उपक्रम यशस्वीपणे राबवलाय. कोळसानिर्मितीबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. आमच्या या कोळसानिर्मितीच्या निसर्गपूरक तंत्रज्ञानाद्वारे जनजागृती करणे हा प्रमुख उद्दे आहे. कचरा व्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धती लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही कार्य करत आहोत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

  • FIRST PUBLISHED :
  •  कोळसा हे अनेक वर्षांपासून चालत आलेले पारंपारिक इंधन आहे. लाकडापासून बनवला जाणारा कोळसा बनवणे म्हणजे प्रदूषण आणि पर्यावरणाला हानी असे समीकरण तयार झाले आहे. या समीकरणाला छेद देत<a href="https://lokmat.news18.com/maharashtra/pune/?utm_source=district_icon&amp;utm_medium=local_categories&amp;utm_campaign=state_stories"> पुण्यातल्या</a> संशोधिका डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांनी एक नवं तंत्रज्ञान विकसित केलंय. हे तंत्रज्ञान शास्त्रशुद्ध आणि निसर्गपूरक असून त्यामुळे प्रदुषणाशिवाय कोळशाची निर्मिती करता येणार आहे.

    MORE
    GALLERIES