पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात घडला आहे. येथील खंडाळा बोरघाटात विचित्र अपघातात 9 वाहने एकमेकांना धडकली. या घटनेनंतर काही काळ एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प होती. यात जीवितहानी झालेली नाही. तर या अपघातात दोन वाहन चालकांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. एका मालवाहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटला. या दरम्यान त्याने अनेक गाड्यांना धडक दिली. घटनास्थळी बोरघाट वाहतूक पोलिसांनी धाव घेत, सर्व अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली.