advertisement
होम / फोटोगॅलरी / पुणे / MLP : राजकारणानंतर क्रिकेटच्या मैदानात धनंजय मुंडेंची एन्ट्री! CSK चा हा खेळाडू आहे टीम आयकॉन

MLP : राजकारणानंतर क्रिकेटच्या मैदानात धनंजय मुंडेंची एन्ट्री! CSK चा हा खेळाडू आहे टीम आयकॉन

MLP : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आता क्रिकेटच्या मैदानात उडी घेतली आहे. यावेळी ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळण्यासाठी पुढाकार घेतल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे. (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी)

01
पुण्यात आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीग (MPL) क्रिकेट स्पर्धांचे 15 ते 29 जून दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजन केले आहे. महाराष्ट्राच्या सहा विभागातील सहा संघ या लीग मध्ये खेळणार असून, मराठवाड्याचा छत्रपती संभाजी किंग्स हा संघ मराठवाड्याचे प्रथमच प्रतिनिधित्व करणार आहे.

02
छत्रपती संभाजी किंग्स या संघाची फ्रंचाईजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या सहकाऱ्यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतली आहे.

03
नेहमी राज्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या धनंजय मुंडे यांनी यानिमित्ताने प्रथमच राज्य स्तरावरील क्रिकेट विश्वातही पदार्पण केले आहे.

04
या लीगमध्ये कोल्हापूर टस्कर्स, पुणेरी बाप्पा, ईगल नाशिक टायटन्स, रत्नागिरी जेट्स, सोलापूर रॉयल्स आणि धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्स हे सहा संघ सहभागी होत आहेत.

05
सर्वच संघांनी आपले आयकॉन प्लेयर्स नियुक्त केले असून, भारतासाठी अंडर 19 वर्ल्ड कप खेळलेला, तसेच रणजी खेळाडू व आयपीएल मधील चेन्नई सुपर किंग्स संघाचा वेगवान गोलंदाज धाराशिव येथील राजवर्धन हंगरकेर हा छत्रपती संभाजी किंग्ज संघाचा आयकॉन खेळाडू असणार आहे.

06
दरम्यान संघात खेळाडूंच्या बोलीकडून झालेल्या सिलेक्शन नंतर या संघात एकूण 22 खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून, त्यातील 11 खेळाडू हे मराठवाड्यातील आहेत, हे विशेष!

07
संघातील सर्व खेळाडूंची आज धनंजय मुंडे यांनी पुण्यातील सहकार नगर भागातील शिंदे हायस्कुलच्या सराव मैदानावर भेट घेत शुभेच्छा दिल्या. तसेच खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी स्वतः धनंजय मुंडे यांनी नेट मध्ये खेळाडूंसह प्रॅक्टिसही केली.

08
मराठवाड्याचा रणजी ट्रॉफी सारख्या स्पर्धांमध्ये स्वतःचा संघ होऊ शकला नाही, मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मराठवाड्यासह ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूंना आम्ही संधी दिली आहे. या महाराष्ट्र प्रीमिअर लीगचा मूळ उद्देश ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा आहे, त्यामुळे मी स्वतः एका टीमची जबाबदारी घेतली आहे. आमचा संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी असेल, असे यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

  • FIRST PUBLISHED :
  • पुण्यात आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीग (MPL) क्रिकेट स्पर्धांचे 15 ते 29 जून दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजन केले आहे. महाराष्ट्राच्या सहा विभागातील सहा संघ या लीग मध्ये खेळणार असून, मराठवाड्याचा छत्रपती संभाजी किंग्स हा संघ मराठवाड्याचे प्रथमच प्रतिनिधित्व करणार आहे.

    MORE
    GALLERIES