सोने चांदी हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लग्न समारंभ, सण, वाढदिवस या दिवशी अनेक घरांत सोन्याची खरेदी केली जाते.
संकटकाळातील गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडं पाहिलं जातं. सोन्याच्या किमती बाजारपेठेनुसार दररोज बदलत असतात.
पुण्यातील बाजारपेठेत दागिन्यांचे अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत. त्यामुळे महिला वर्गाची सोने खरेदीसाठी पुण्याला पसंती असते.
सोने आणि चांदीचे भाव हे रोज बदलत असतात. त्यामुळे तुम्हाला खरेदी करताना आजचे भाव माहिती असणे आवश्यक आहे.
पुण्यात आज पुन्हा सोन्याच्या दरात अल्पशी वाढ झाली आहे. शुक्रवारी सोने दर घसरल्यानंतर आज पुन्हा सोने महागले आहे.
पुण्याच्या बाजारपेठेत सोन्याचे आज (18 फेब्रुवारी) 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतीतोळा 58,096 रूपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 53,255 रुपये आहे.
पुण्यात शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतीतोळा 57,910 रूपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 53085 रुपये होता. या दरात आज वाढ झाली आहे.
पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये जुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि अन्य कारणांमुळे बदल होऊ शकतो.