आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर रोज बदलतात. पुण्यात होळीपूर्वी कमी झालेले सोन्याचे भाव होळीनंतरच्या दोन दिवसांमध्ये वाढले होते.
भारतीयांमध्ये सोनं खरेदीचा ट्रेन्ड आहे. वाढदिवस, लग्न, मंगल कार्यात सोन्याची खरेदी केली जाते. सोनं खरेदी करण्यापूर्वी त्याचा ताजा भाव माहिती असणे आवश्यक आहे.
पुण्यात आज (13 मार्च) 24 कॅरेट सोन्याचा दर 58288 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 53431 आहे. शनिवारपेक्षा आज सोन्याचे दर जास्त आहेत.
पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये ज्वेलरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि अन्य कारणांमुळे बदल होऊ शकतो.