सोनं खरेदीसाठी महत्त्वाचा मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयाला आता काही तास उरले आहेत. या निमित्तानं अनेकांना खरेदीचे वेध लागलेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव रोज बदलतात. त्यामुळे सोनं खरेदी करण्यापूर्वी ताजा भाव माहिती असणे आवश्यक आहे.
पुणे शहरातील सोन्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. येथील दुकानांमध्ये दागिन्यांचे निरनिराळे ऑप्शन मिळतात. त्यामुळे ते खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.
पुण्यात गुरूवारी (20 एप्रिल) 24 कॅरेट सोन्याचा प्रतीतोळा दर 62047 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 56877 रुपये प्रती तोळा इतका होता.
पुण्यात आज (21 एप्रिल) 24 कॅरेट सोन्याचा प्रतीतोळा दर 62077 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 56901 रुपये प्रती तोळा इतका आहे.
पुण्यात गुरूवारी 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 6204 तर 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 5687 इतकी होती.
आज 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 6207 तर 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 5690 इतकी आहे. अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याच्या दरात फारशी वाढ न झाल्यानं पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये ज्वेलरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि अन्य कारणांमुळे बदल होऊ शकतो.