या आगीत प्रत्येक दुकानदारांचं अंदाजे चार ते पाच लाखांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे हातावर पोट असणारे हे किरकोळ विक्रेते अक्षरश: रस्त्यावर आलेत. आगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या आपल्या दुकानांकडे हताशपणे पाहण्याशिवाय या दुकानदारांच्या हाती काहीच उरलं नाही आहे. कारण रात्रीच्या आगीने सर्वस्वच हिरावून घेतलं आहे.
या आगीत कँम्प परीसरातील या फेमस फॅशन स्ट्रीटवरील लहानमोठी तब्बल पाचशेहून जास्त दुकानं जळून खाक झाली आहेत. त्यात छोट्यामोठ्या व्यापाऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. सुदैवाची बाब म्हणजे ही आग आजबाजुच्या दाट लोकवस्ती इमारतींपर्यंत न पोचल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पण फॅशन स्ट्रीटवरील कित्येक दुकानदारांचा करोडोंचा माल आगीत जळून खाक झाला आहे