पावसाळा सुरू झाल्यामुळे अनेक पर्यटक सिंहगडावर ट्रेकींग किंवा फिरण्याचा आनंद लुटतात. मात्र, आता सिंहगडावर जाताना 10 वेळा विचार करावा लागणार आहे. सिंहगडाच्या घेऱ्यात बिबट्या आणि बछड्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घेरा सिंहगडचे माजी सरपंच दिलीप यादव यांच्या बंगल्यावरुन हे फोटो घेण्यात आले आहेत. गावाच्या अगदी जवळच हा बिबट्या दिसून आला आहे. सिंहगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या गावांमध्ये याबाबत नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितली आहे.