

मेरठमधील एक तरुण इंजिनिअर आसिफने कोरोना महासाथीदरम्यान असा स्टार्टअप तयार केला आहे की ज्यामुळे तो महिन्याला लाखो रुपये कमावत आहे. या तरुणाने असा कूलर तयार केला आहे जो आरओचे पाणीही देऊ शकतं.


इंजीनियर आसिफने केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा लाभ घेतला आणि आपला रोजगार सुरू केला. इतकच नाही तर त्याने आणखी 20 जणांना रोजगार मिळवून दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर घोषणेनंतर अनेक तरुणांनी वेगळा मार्ग निवडत त्यात यश मिळवून दाखवलं आहे.


याशिवाय आसिफने चालतं फिरतं जिम तयार केलं आहे. याने या वस्तूच पेटंटही केलं आहे. बीटेक, एमटेकपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या आसिफ याने सांगितले की त्यांनी आपला डबल विन्डो कूलरचा प्रोजेक्ट तयार करीत त्याला पहिल्यांदा भारत सरकारच्या स्टार्ट अप इंडियाच्या वेबसाइटवर अपलोड केला. आसिफचं म्हणणं आहे की, स्टार्ट अप इंडिया योजनेमुळे त्याच्या जीवनात मोठा बदल झाला आहे.


आसिफने कोरोनाचे संकट एक नव्या संधीत रुपांतरिक केले आहे. केंद्र सरकारच्या स्टार्टअप इंडिया योजनामुळे आसिफचं जीवन बदललं आहे. लॉकडाऊनमुळे जेव्हा सर्वचजण घरात होते, त्या काळात तो केवळ घरात थांबला नाही, तर त्यातून त्याने सदुपयोग केला. त्याने यादरम्यान असा कूलर तयार केला आहे ते केवळ थंड हवाच देत नाही तर आरओचं पाणीही देतं.


आसिफने जिल्हा उद्योग केंद्राकडून माहिती मिळवित डबल विन्डो कूलर तयार करण्याचा प्रकल्प वेबसाइलवर अपलोड करीत पेटंट करवून घेतलं. बँक ऑफ बडोदाकडून 25 लाखांचा कर्ज घेत आणि आपला रोजगार सुरू केला. सध्याच्या दिवसात आसिफने 20 बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. याशिवाय त्याने 7 नवे प्रकल्प सुरू केले आहे.