कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील साळगाव इथल्या सचिन केसरकर या शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकांच्या माध्यमातून गो कोरोना गो चा संदेश दिलाय.
कोरोनाचा व्हायरस भारतात आल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गो कोरोना गोची घोषणा दिली होती. त्यानंतर देशभर ते ट्रोलही झाले होते.
त्याची ही अनोखी शक्कल आता सर्व विभागात चर्चेचा विषय झाली आहे. तर लोक ही अक्षर पाहायला सचिनच्या शेतात येत आहेत.
संपूर्ण हिरवगार शेत आणि त्यात कोरोनाला पळवून लावण्याची अक्षरं ही कोरोना योध्यांना पाठिंबा देण्यासाठी काढल्याचं सचिनचं म्हणणं आहे.