बॉलीवूडमध्ये सुद्धा अनेक बहिण-भावांच्या प्रसिद्ध जोड्या आहेत. इतकचं नव्हे तर त्यांच्या नात्यात किती गोडवा आहे हे वारंवार पाहायलासुद्धा मिळतं. हे बहिण भावांमध्ये घट्ट मैत्रीचं नातं असल्याचं सुद्धा बऱ्याच वेळा बघायला मिळतं. आज आपण अशाच बॉलीवूड मधील बहिण-भावांच्या जोड्यांवर नजर टाकणार आहोत.
अभिनेता सलमान खान आणि अर्पिता ही जोडी तर सगळ्यांनाचं परिचयाची आहे. सलमान आपल्या छोट्या बहिणीवर खुपचं प्रेम करतो. अर्पिता ही सलमानची सख्खी बहिण नाही. तरीसुद्धा या दोघांचा नातं खुपचं घट्ट आहे. सलमान अर्पिताला सख्ख्या बहिणीपेक्षा सुद्धा जास्त जीव लावतो.
अभिनेता रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर या बहिण भावांमध्ये सुद्धा खूपच प्रेम आहे. रिद्धिमा ही रणबीरची मोठी बहिण आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठ्या निर्णयांत रणबीर रिद्धिमाचा सल्ला आवर्जून घेतो. रणबीर आणि रिद्धिमा ही ज्येष्ठ अभिनेता आणि अभिनेत्री ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची मुलं आहेत.
बॉलीवूडच्या नवाब कुटुंबातील प्रसिद्ध भावंडे म्हणजे सैफ अली खान आणि सोहा अली खान होय. या दोघांमध्ये सुद्धा खुपचं छान नातं असल्याचं दिसून येतं. सतत या दोघांना एकमेकांसोबत पाहण्यात येतं. सैफसुद्धा सोहासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करताना दिसून येतो.
सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुले सारा आणि इब्राहीम यांच्या नात्यात सुद्धा फारचं गोडवा दिसून येतो. हे दोघे सतत एकमेकांसोबत सुट्टीचा आनंद घेतानाही दिसून येतात. त्याचबरोबर सोशल मीडियावर सुद्धा सतत हे दोघे एकमेकांसोबत मजामस्ती करताना व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असतात. फक्त भावंडेच नव्हे तर हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र सुद्धा आहेत.
सैफ अली खान आणि दुसरी पत्नी करीना यांच्यापासून असलेला मुलगा म्हणजे तैमुर, सारा आणि तैमुर सावत्र बहिण भाऊ असले तरी या दोघांच्या मध्ये खूपच प्रेमळ नातं आहे. सारा आपल्या या छोट्याशा भावाला खूपचं प्रेम देताना दिसून येते.
बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर यांच्यात सुद्धा खूप घट्ट नातं झाल्याचं आत्ता दिसून येतं आहे. ही दोघे सावत्र भावंडे आहेत. मात्र जान्हवीची आई अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यू नंतर अर्जुन कपूरने सावत्र बहिण सारा आणि ख़ुशीला खुपचं आधार दिल्याचं दिसून येतं.