ग्रीस आणि तुर्की (turkey) या देशांना एका शक्तीशाली भूकंपानं जोरदार धक्का दिला. यामुळे प्रचंड आकाराच्या गगनचुंबी इमारतीही अवघ्या काही सेकंदात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे जमिनीवर कोसळल्या. या भूकंपामध्ये 22 नागरिकांनी जीव गमवला आहे. 7 रिश्टर स्केलच्या भूंकपाच्या धक्क्यातून हे देश अजूनही सावरलेले नाही.
एक मोठी 'फॉल्ट लाईन' असलेल्या भूमीवर तुर्कस्तान हा देश वसला आहेत. त्यामुळे सर्वाधिक भूकंपाचे धक्के जाणवणाऱ्या देशांमध्ये तुर्कस्तानचा क्रमांक वरचा आहे.
तुर्कीचे गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी सांगितलं की, भूकंपामुळे बोर्नोवा आणि बेराकली शहरातील इमारतींचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सध्या सगळीकडे बचावकार्य सुरू आहे. लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं जात आहे. फोटो: AP
इजमिर शहराला भूकंपाचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. या शहरातील कमीत कमी 20 इमारती भूईसपाट झाल्या आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रेस्क्यू टीम सध्या बचावकार्य करत आहे.
ग्रीसच्या सामोस या बेटालाही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. ग्रीस सरकारनं सामोर बेटावर राहणाऱ्या जवळपास 45 हजार नागरिकांना समुद्रतटापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
अमेरिकन जिओलॉजिकल सर्वेक्षणाच्या माहितीनुसार, ग्रीसच्या नोन कार्लोवसिअन शहराच्याजवळ 14 किलोमीटरवर भूकंपाचं केंद्र होतं. या परिसरात नागरिकांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे.