कोरोनाग्रस्तांसाठी BLOOD TEST महत्त्वाची ठरणार; रुग्णाच्या मृत्यूचा धोका समजणार
शास्त्रज्ञांना रक्तातील असे बायोमार्कर सापडले आहेत, ज्यावरून कोरोना रुग्णाच्या मृत्यूचा धोका किती आहे हे समजू शकतं.
|
1/ 9
जगभरात आतापर्यंत 7 लाखांचा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात 43 हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
2/ 9
सध्या एखाद्या रुग्णाला कोरोना आहे की नाही याचं निदान चाचणीद्वारे होतं. मात्र आता कोरोना रुग्णांना मृत्यूचा धोका किती आहे हेदेखील समजण्यास मदत होणार आहे.
3/ 9
कोरोना रुग्णाला मृत्यूचा धोका किती आहे हे फक्त ब्लड टेस्टमार्फत समजू शकतं, असा दावा अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी केला आहे.
4/ 9
अमर उजालाच्या वृत्तानुसार अमेरिकेच्या जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला. फ्युचर मेडिसीन जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
5/ 9
या संशोधनाचे अभ्यासक जॉन रीस म्हणाले, कोरोना संक्रमिक रुग्णांची प्रकृती खराब झाल्याने बायोमार्कर अणू प्रभावित होतात, असं चीनमध्ये झालेल्या संशोधनात दिसून आलं.
6/ 9
बायोमार्कर अणूमुळे कोरोना संक्रमित रुग्णांच्या शरीरात जळजळ, सूज आणि रक्तस्राव वाढतो. त्यामुळेच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं आणि अशा परिस्थिती त्यांचा मृत्यूही होतो.
7/ 9
त्यानंतर त्यावर अमेरिकेतही संशोधन करण्यात आलं. चीनमध्ये झालेल्या अभ्यासानंतर अमेरिकेतल्या शास्त्राज्ञांनाही असे बायोमार्कर अणू सापडले आहेत ज्यांचा संबंध कोरोना रुग्णांचा मृत्यू आणि त्यांची प्रकृती गंभीर होण्याशी आहे.
8/ 9
299 कोरोना संक्रमित रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी 200 रुग्णांमध्ये पाच बायोमार्कर अणू मिळाले आहेत. सीआरपी, आइएल-6, फेरेटिन, एलडीएच आणि डी-डिमर अशी नावं आहेत.
9/ 9
हे बायोमार्कर रक्तात असतात जे मेडिकल इंडिकेटर्सचं काम करतात, त्यामुळे रक्तचाचणीमार्फत हे बायोमार्कत तपासून यामार्फत कोरोना संक्रमित रुग्णाला मृत्यूचा धोका किती आहे हे समजू शकतो, असं शास्त्रज्ञ म्हणालेत.