advertisement
होम / फोटोगॅलरी / बातम्या / यूपीच्या या सेलिब्रिटींचीच चालते बॉलिवूडवर सत्ता

यूपीच्या या सेलिब्रिटींचीच चालते बॉलिवूडवर सत्ता

मायानगरी मुंबईत देशभराजून दररोज हजारो लोक आपलं नशिब आजमावण्यासाठी येतात. पण यातल्या काहींनाच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान मिळतं.

  • -MIN READ

01
मायानगरी मुंबईत देशभराजून दररोज हजारो लोक आपलं नशिब आजमावण्यासाठी येतात. पण यातल्या काहींनाच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान मिळतं. असेच काहीसे बॉलिवूडमधले स्टार आहेत जे उत्तर प्रदेशमधून आले आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी बी- टाऊनवर अधिराज्य केलं.

02
सर्वात आधी नाव घ्यायचं ठरलं तर ते म्हणजे ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन यांचं. इलाहाबादमध्ये अमिताभ यांचा जन्म झाला. सिविल लाइन्सच्या पीडी टंडन रोड येथील मुलांच्या शाळेत आणि कॉलेजमध्ये अमिताभ यांचं शिक्षण झालं. बिग बी यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. यात तीन राष्ट्रीय पुरस्कार तर १२ फिल्मफेअर पुरस्कारांचाही समावेश आहे.

03
नसीरुद्दीन शाह यांचा जन्म २० जुलै १९५० मध्ये उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे झाला. नसीरुद्दीन यांनी 'अ वेडनसडे', ‘डर्टी पिक्चर’, ‘सात खून माफ’, ‘बेगम जान’ आणि ‘डेढ़ इश्किया’ सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

04
अभिनेता राजपाल यादवचा जन्म १६ मार्च १९७१ मध्ये शाहजहांपुर येथे झाला. विनोदी तसेच गंभीर भूमिका लिलया पेलणाऱ्या राजपालने बॉलिवूडमधील अनेक सिनेमांत काम करून आपलं स्थान पक्क केलं आहे.

05
बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या प्रियांका चोप्राचा जन्म उत्तर प्रदरेशच्या बरेली येथे झाला होता. बरेलीमध्येच प्रियांका लहानाची मोठी झाली. तिने बरेली येथील आर्मी शाळेतून सुरुवातीचं शिक्षण घेतलं.

06
अनुष्का शर्माचा जन्म १ मे १९८८ मध्ये अयोध्या येथे झाला. बंगळुरूमध्ये लहानाची मोठी झालेल्या अनुष्काने आर्मीच्या शाळेतून आणि माउंट कार्मेल शाळेतून शिक्षण घेतलं. अनुष्काने गेल्यावर्षी तिने भारतीय क्रिकेटचा कर्णधार विराट कोहलीशी लग्न केलं.

07
बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी दिशा पाटनी बरेलीची राहणारी आहे. दिशाचं कुटुंब मुळचं उत्तराखंड येथील टनकपुर येथले राहणारे आहेत. मात्र वडील जगदीश पाटनी बरेली येथे आले तर संपूर्ण कुटुंब बरेलीमध्ये राहायला आलं.

08
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा जन्म मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाना येथे झाला. हरिद्वारच्या गुरुकुल कांगडी यूनिव्हर्सिटीमधून त्याने विज्ञान शाखेत पदवी घेतली. पण त्याला लहान शहरातील जगणं फारस आवडलं नाही. तो दिल्लीला आला आणि त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं शिक्षण घेतलं. ‘गँग्ज ऑफ वासेपुर’ १ आणि २, ‘तलाश’ आणि ‘पान सिंह तोमर’ यांसारख्या सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • मायानगरी मुंबईत देशभराजून दररोज हजारो लोक आपलं नशिब आजमावण्यासाठी येतात. पण यातल्या काहींनाच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान मिळतं. असेच काहीसे बॉलिवूडमधले स्टार आहेत जे उत्तर प्रदेशमधून आले आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी बी- टाऊनवर अधिराज्य केलं.

    MORE
    GALLERIES