UK मधील महिलेने एक रिलेशनशिप पोर्टलवर एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने या पोर्टलवर सांगितलं की, लॉकडाऊनदरम्यान कशाप्रकारे तिने आपल्या प्रियकराची टेस्ट घेतली. महिलेने सांगितलं की, काही वर्षांपूर्वी ती आणि जॉर्ज टिंडरवर भेटले होते. त्यावेळी महिलेचं वय 16 होतं. आणि एप्रिलमध्ये तिने आपल्या प्रेमाचा सहावा वाढदिवस साजरा केला.
महिलेने पुढे लिहिलं की, 2019 मध्ये जॉर्जला दुसऱ्या शहरात नोकरी मिळाली. त्यामुळे त्याला नेहमी प्रवास करावा लागत होता. त्यामुळे आमच्यातील अंतर वाढलं. तरीही आमचं लॉन्ग डिस्टन्सरिलेशनशीप सुरू होतं. मीदेखील एके ठिकाणी पार्ट टाइम नोकरी करायला सुरुवात केली. मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे क्लासेस ऑनलाइन झाली.