SBI ग्राहकांना मोठा धक्का आहे. पुढचे काही तास तुमच्या फोनमध्ये Yono app चालणार नाही. काही तांत्रिण कारणांमुळे हे अॅप फोनवर चालणार नाही अशी माहिती Yono app द्वारे देण्यात आली आहे. मेंटेनन्सचं काम सुरू असल्याने App वापरताना ग्राहकांना काही अडचणी येऊ शकतात. गुगल पे फोन पेवरून जरी तुम्ही पेमेंट करत असाल आणि सर्व्हर डाऊन असं येत असेल तर तुम्ही थोडावेळ थांबा. याआधी 1 एप्रिल रोजी देखील गुगल पे फोन पे वापरताना ग्राहकांना अडचणी आल्या होत्या.