मुंबई : प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही बदल होत असतात. त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. 2022 चा शेवटचा महिना डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. या महिन्यात अनेक नियम बदलत होत आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होईल. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपासून ते पेन्शनचे नियम बदलत आहेत. पेन्शनधारकांनी हयातीचा दाखला सादर न केल्यास पेन्शनचे पैसे रोखता येतात. त्याचबरोबर गाड्यांच्या वेळेतही बदल होणार आहे.