बिलासपूर पोलीस स्टेशन हद्दीत हा अपघात झाल्याची माहिती मिळाली. एका सोहळ्यावरून घरी परत येत असताना हा भयंकर अपघात झाला.
कार्तिकेय शर्मा यांच्या एसयूव्ही कारला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात कारचं मोठं नुकसान झालं आहे.
हरियाणातील चरखी दादरी जिल्ह्यातील डुडीवाला किशनपुरा गावात एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत असताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. कार्यक्रमात सहभागी होऊन खासदार गुरुग्रामला जात होते. पोलिसांनी सांगितले की, अपघातानंतर खासदार यांना रुग्णालयात नेण्यात आलं.
रुग्णालयात डॉक्टरांनी खासदार कार्तिकेय शर्मा यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही असंही डॉक्टर म्हणाले.