अक्षय्य तृतीयेआधी गुडन्यूज मिळाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे आजच टाकी फुल्ल करून घ्या. मिळालेल्या माहितीनुसार ब्रेंट क्रूड गेल्या २४ तासांत 2 डॉलरने स्वस्त झालं आहे.
दोन दिवसांत किमती प्रति बॅरल 4 डॉलरने खाली आल्या आहेत. शुक्रवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्येही बदल दिसून येत आहे. आज एनसीआरमधील अनेक शहरांमध्ये दर बदलले आहेत.
सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, यूपीच्या गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) जिल्ह्यात आज सकाळी पेट्रोल 27 पैशांनी 96.65 रुपये प्रति लिटर स्वस्त झाले आहे.
गाझियाबादमध्ये आज पेट्रोल 32 पैशांनी महागले आणि ते 96.58 रुपये प्रति लीटरवर पोहोचले, तर डिझेल 30 पैशांनी वाढले आणि 89.75 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
दिल्लीत पेट्रोल ९६.६५ रुपये आणि डिझेल ८९.८२ रुपये प्रति लिटर तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर तर कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. त्यामुळे तुमच्या शहरातील दर चेक करूनच टाकी फुल्ल करा